शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्त मुस्लिम भाजपाला मत देतील आणि पाकिस्तानधार्जिणे कचरतील, भाजपा नेते बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 11:58 IST

भाजपाच्या एका नेत्याने मुस्लिमांच्या देशभक्तीवरून वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे.

बंगळुरू - काहीतरी वादग्रस्त वक्तव्ये करून रोज नवनव्या वादांना तोंड फोडणारे नेते भाजपामध्ये कमी नाहीत. आता भाजपाच्याकर्नाटकमधील एका नेत्याने मुस्लिमांच्या देशभक्तीवरून वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. ''देशभक्त मुस्लिम हे भाजपाला मतदान करतील, तर जे पाकिस्तानचे समर्थन करतात, असे मुस्लिम भाजपाला मत देण्यास कचरतील,''असे वक्तव्य कर्नाटक सराकरमधील पंचायती राज मंत्री आणि भाजपा नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. रविवारी एका ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना  ईश्वरप्पा म्हणाले की, ''आता मी जे सांगत आहे ते प्रसारमाध्यमांनी लिहून घ्यावे, एक राष्ट्रभक्त मुस्लिम भाजपाला मत देईल. मात्र जे पाकिस्तान समर्थक आणि राष्ट्रद्रोही आहेत, असे मुस्लिम भाजपाला मत देण्यास कचरतील.'' दरम्यान, भाजपा मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणार नाही कारण ते भाजपावर विश्वास ठेवत नाहीत, असा दावा ईश्वरप्पा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केला होता. कर्नाटकमधील भाजपा सरकार गोहत्येवर बंदी घालणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. 

दरम्यान, देशभक्त मुस्लिमांचा उल्लेख करताना ईश्वरप्पा यांनी आपल्या मतदारसंघाबाबत सांगितले. ''भाजपा सत्तेवर येण्यापूर्वी मी भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या काही आमदारांना भेटलो होतो. मात्र त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ५० हजारहून अधिक मुस्लिम मतदार असून, त्यांना गमावल्यास आपला पराभव होईल, अशी भीती या आमदारांनी व्यक्त केली. त्यानंतर मी त्यांना माझ्या मतदारसंघाचे उदाहरण दिले. शिमोगा या माझ्या मतदारसंघात ५० हजारांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. मात्र मी कधीही त्यांच्याकडे मत मागण्यासाठी गेलो नाही. मी या काँग्रेस आमदारांना सांगितले की, माझ्या मतदारसंघात माझ्या कुरुबा जातीचे केवळ ८ ते १० हजार मतदार आहेत. तर मुस्लिम मतदार ५० हजारांहून अधिक आहेत. मात्र मी आतापर्यंत एकदाही एकाही मुस्लिमाला सलाम करायला गेलो नाही.  तहीही मी ४७ हजार मतांनी विजयी झालो.'' 

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटकMuslimमुस्लीमPoliticsराजकारण