चाकूर कृउबा समिती सभापतीपदी पाटील बिनविरोध निवड : अशोकराव चिंते उपसभापती
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30
चाकूर : चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. केवळ दोन संचालकांच्या निवडीसाठी मतदान झाले होते. विशेष म्हणजे प्रशांत पाटील आणि अशोकराव चिंते हे मतदानाद्वारे विजयी झाले होते. आणि सोमवारी सकाळी झालेल्या सभापती व उपसभापती पदांसाठीच्या निवडीत सभापतीपदी प्रशांत पाटील तर उपसभापतीपदी अशोकराव चिंते यांची बिनविरोध निवड झाली आहे.

चाकूर कृउबा समिती सभापतीपदी पाटील बिनविरोध निवड : अशोकराव चिंते उपसभापती
च कूर : चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. केवळ दोन संचालकांच्या निवडीसाठी मतदान झाले होते. विशेष म्हणजे प्रशांत पाटील आणि अशोकराव चिंते हे मतदानाद्वारे विजयी झाले होते. आणि सोमवारी सकाळी झालेल्या सभापती व उपसभापती पदांसाठीच्या निवडीत सभापतीपदी प्रशांत पाटील तर उपसभापतीपदी अशोकराव चिंते यांची बिनविरोध निवड झाली आहे. चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही १८ संचालकांची आहे. काही दिवसांपूर्वी या संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून वाटाघाटीही झाल्या होत्या. मात्र ऐनवेळी त्या फिसकटल्याने १६ जागा बिनविरोध निघाल्या. केवळ दोन जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये ग्रामपंचायत मतदारसंघातील प्रशांत पाटील आणि सोसायटी मतदारसंघातील अशोकराव चिंते हे विजयी झाले होते. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात एच.व्ही. हरिदास यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी सभापतीपदासाठी प्रशांत पाटील यांचा तर उपसभापती पदासाठी अशोकराव चिंते यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने प्रशांत पाटील व अशोकराव चिंते यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी नूतन संचालकांसह भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, जिल्हा सरचिटणीस वसंतराव डिगोळे, मेघराज बाहेती, रणजित मिरकले, गोपाळ माने, अभिमन्यू धोंडगे, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव पाटील, बालाजी सूर्यवंशी, हरिभाऊ येरमे, शिवशंकर हाळे, चाँदपाशा मासुलदार, किशनराव रेड्डी, अशोक पाटील आदींची उपस्थिती होती. चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागा बिनविरोध निघाल्या असल्या तरी केवळ दोन जागांसाठी मतदान झाले होते. यात प्रशांत पाटील आणि अशोकराव चिंते यांची मतदानाद्वारे निवड झाली. त्यामुळे पाटील व चिंते यांची मोठी कसोटी लागली होती. या निवडणुकीत विजयी झालेले पाटील व चिंते हे अनुक्रमे सभापती व उपसभापती ठरले आहेत. त्यामुळे दोन जागांसाठीची झालेली निवडणूक ही पदासाठीची ठरली आहे.या नूतन पदाधिकार्यांचा आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ही निवड जाहीर होताच चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच पेढेही वाटले.