पठाणकोट : एअरबेसच्या गेटवर एका संशयिताला अटक
By Admin | Updated: January 6, 2016 20:33 IST2016-01-06T20:33:37+5:302016-01-06T20:33:37+5:30
पठाणकोटमधील एअरबेसच्या मुख्य गेटजवळ बॅग घेऊन फिरणा-या एका संशयित व्यक्तीला लष्कराच्या जवानांनी अटक केली आहे. या अटक केलेल्या संशयित व्यक्तीची लष्कराकडून

पठाणकोट : एअरबेसच्या गेटवर एका संशयिताला अटक
>ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. ६ - पठाणकोटमधील एअरबेसच्या मुख्य गेटजवळ बॅग घेऊन फिरणा-या एका संशयित व्यक्तीला लष्कराच्या जवानांनी अटक केली आहे. या अटक केलेल्या संशयित व्यक्तीची लष्कराकडून चौकशी करण्यात येत आहे.
येथील एअरबेसवर हल्ला करणा-या सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आज संध्याकाळी लष्कराने आपले सर्च ऑपरेशन थांबविले. त्यानंतर काही तासानंतर एअरबेसच्या मुख्य गेटजवळ बॅग घेऊन फिरणा-या एका संशयित व्यक्तीला अटक केली असून त्याची लष्कर कसून चौकशी करत आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर देत लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात लष्कराचे सात जवानही शहीद झाले. दरम्यान, या हल्ल्याची चौकशी एनआयएकडून करण्यात येत आहे.