पठाणकोट हल्ला : नवाज शरीफ यांचे सहकार्याचे आश्वासन

By Admin | Updated: January 5, 2016 17:56 IST2016-01-05T17:47:44+5:302016-01-05T17:56:19+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन पठाणकोट हल्ल्याबाबत चौकशी करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Pathankot attack: Nawaz Sharif's assurances of cooperation | पठाणकोट हल्ला : नवाज शरीफ यांचे सहकार्याचे आश्वासन

पठाणकोट हल्ला : नवाज शरीफ यांचे सहकार्याचे आश्वासन

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन पठाणकोट हल्ल्याबाबत चौकशी करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी श्रीलंकेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ३.३० च्या सुमारास फोन केला. फोनच्या माध्यमातून पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद्यांच्या विरोधात पाकिस्तान नेहमीच भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहील असे नवाज शरीफ यांनी सांगितले. 

Web Title: Pathankot attack: Nawaz Sharif's assurances of cooperation