पठाण यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती
By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:40+5:302015-08-17T22:38:40+5:30
सोलापूर : महापालिकेचे नगर सचिव ए. ए. पठाण यांना सहायक आयुक्त (विशेष) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

पठाण यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती
स लापूर : महापालिकेचे नगर सचिव ए. ए. पठाण यांना सहायक आयुक्त (विशेष) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पठाण यांनी बरीच वर्षे नगर सचिव म्हणून कामकाज पाहिले. निवृत्तीला काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना त्यांना पदोन्नती मिळावी म्हणून पदाधिकार्यांनी शिफारस केली होती. आयुक्त विजयकुमार काळमपाटील यांनी पठाण यांना सहायक आयुक्त पदनाम पदाची वेतनश्रेणी द्यावी अशी १४ ऑगस्ट रोजी शिफारस केली. शासनाच्या मान्यतेस अधीन राहून पठाण यांना सहायक आयुक्त (विशेष) या पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यांच्याकडे नगरसचिव पदाबरोबरच हद्दवाढ भागाचा कारभार येणार आहे. पदोन्नतीबद्दल महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृहनेते संजय हेमगड्डी यांनी अभिनंदन केले. (फोटो आहे....१७एचआर२६)