शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांकडचे की आईकडचे आजी-आजोबा; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलावर कुणाचा अधिकार? SC नं दिला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:30 IST

गेल्या वर्षी, म्हणजेच 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट पीकवर अस्ताना, संबंधित मुलाच्या वडिलांचे 13 मे रोजी तर आईचे 12 जून रोजी निधीन झाले होते.

नवी दिल्ली - कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलाच्या पालन पोषणाच्या जबाबदारीसंदर्भात सर्वोच्च न्यायानलायने आज मोठा निर्णय दिला आहे. कोरोनामुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलाच्या पालन-पोषणाची जबाबदारी आईकडील आजी-आजोबांऐवजी वडिलांकडील आजी-आजोबांकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court judgement) दिला आहे. संबंधित मुलगा आपल्या आई-वजिलांसोबत गुजरातमध्ये राहत होता. 

गेल्या वर्षी, म्हणजेच 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट पीकवर अस्ताना, संबंधित मुलाच्या वडिलांचे 13 मे रोजी तर आईचे 12 जून रोजी निधीन झाले होते. यानंतर, आईच्या अंत्यसंस्कारासाठी आईकडील आजी-आजोबांनी त्याला अहमदाबादमधील त्याच्या वडिलांकडील आजी-आजोबांकडून दाहोद येथे नेले होते आणि तेव्हापासून संबंधित मुलगा तेथेच होता. त्याला परत अहमदाबादला आणण्यात आले नव्हते.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिली होती स्थगिती -हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की संबंधित 6 वर्षांच्या मुलावर आईकडील कुटुंबीयांपेक्षा अधिक अधिकार वडिलांकडील आजी-आजोबांचा आहे, मुलाचे आरोग्य आणि शिक्षण यासंदर्भात चिंता व्यक्त करत वडिलांकडील आजी-आजोबांनी त्याचा ताबा मागितला होता. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने निर्णय देताना, मुलाच्या 46 वर्षीय मावशीला ती अविवाहित, केंद्रीय कर्मचारी आणि एकत्रित कुटुंबात राहात असल्याच्या कारणावरून मुलाचा ताबा दिला होता. मुलाच्या पालन-पोषणासाठी हेच योग्य आहे, याउलट वडिलांकडील आजी-आजोबा दोघेही वरिष्ठ नागरिक आहेत आणि आजोबा पेन्शनवर अवलंबून आहेत, असे न्यायालयाचे म्हणणे होते.  मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती एमआर शाह आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली होती. 

काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय - गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, की दाहोदच्या तुलनेत अहमदाबादमध्ये शिक्षणाची सुविधा अधिक चांगली आहे. दाहोद एक आदिवासी भाग आहे. 46 वर्षीय अविवाहित मवशीच्या तुलनेत वरिष्ठ नागरिक आजी-आजोबांच्या (वडिलांकडील) अयोग्यतेसंदर्बात, 71 आणि 63 वर्षीय आजी-आजोबांना त्यांच्या नातवाच्या ताब्यासाठी कसे अयोग्य ठरवले जाऊ शकते? असा प्रश्न खंडपीठाने, मावशीच्या वकिलाला केला होता. तसेच, 'सध्या 71 आणि 63 हे वय काहीच नाही, यापेक्षाही अधिक वयात लोक सशक्त राहतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयGujaratगुजरात