संतोष ठाकूर नवी दिल्ली : गुजरातेत सरकार स्थापन झाल्यावर शेतकरी, पाटीदार (पटेल) आणि युवकांची नाराजी दूर करण्यासाठी कार्य करावे लागेल, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्या नेत्यांना सांगितल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.वरिष्ठ पदाधिका-याने सांगितले की, भाजपाचे उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यावर शेतकºयांचे कर्ज माफ केले गेले. भाजपाची सत्ता असलेल्या आणखी काही राज्यांनी शेतक-यांना दिलासा दिला. परंतु गुजरातेत शेतकºयांची भावना आपली फसवणूक झाल्याची होती.गुजरातेत भुईमूग, कापूस आणि इतर पिके घेणारे शेतकरी सातत्याने मागणी करीत होते तरी राज्याने काही निर्णय घेतला नाही. पक्षाला आता या दिशेने काही कार्य करावे लागेल. शहा यांनी या कामाला गती द्यायचा सल्ला दिला आहे.गुजरातेत नवे सरकार स्थापन झाले की पटेल आणि युवकांना पुन्हा जोडण्यासाठी कार्य केले जाईल. त्याचे कारण हे आहे कीपटेलांची संख्या मोठी असलेल्या क्षेत्रांतील भाजपाच्या जागा कायम राहिल्या तरी पुढेही असेच असेल, असे मानता येत नाही. पटेल आणि युवकांबाबत काही मोठी पावले उचलावी लागतील.हा पदाधिकारी म्हणाला की, २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर लोकांची नाराजी द्वेषात रूपांतरित होऊ नये, असे पक्षाला वाटते. त्यामुळेच पटेल, युवक हे नव्या सरकारच्या केंद्रस्थानी असतील.
नव्या सरकारमध्ये पटेल, युवकांना प्राधान्य : नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:18 IST