शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

"... तर मी २०२४ मध्ये त्याला जिंकवण्यासाठी सर्वकाही करेन"; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:48 IST

विरोधकांकडून अर्थसंकल्पावर करण्यात आली टीका

ठळक मुद्देविरोधकांकडून अर्थसंकल्पावर करण्यात आली टीकाशेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी डेअरी उत्पादनात उतरावं, बाबा रामदेव यांचा सल्ला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या अर्थसंकल्पाचं समर्थन केलं. तर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका करत त्याचा सामान्य व्यक्तीला कोणताही फायदा होणार नसल्याचं म्हटलं. दरम्यान, यानंतर पंतजलीचे आयुर्वेदचे संस्थापक बाबा रामदेव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जर अशा परिस्थितीत कोणी यापेक्षा चांगला अर्थसंकल्प तयार करून दाखवला तर २०२४ मध्ये त्याच्या विजयसाठी मी सर्वकाही करायला तयार आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं. "सरकार धोरणं ठरवू सकतं. जर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढवायचंआहे तर त्यांना डेअरी उद्योग वाढवायला हवा. डेअरी उद्योगासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यांना जे काही आवश्यक आहे ते सरकारनं दिलं आहे. अशातच जे शेतकरी घरात गायी, म्हशी किंवा बकऱ्या पाळू शकतात त्यांनी यात उतरायला हवं," असं बाबा रामदेव म्हणाले. "आपण जवळपास २ लाख कोटी रूपयांचं खाद्यतेल आयात करतो. ते जेव्हा आपल्या देशात तयार होऊ लागेल तेव्हा पाच वर्षांमध्ये कमीतकमी १२ ते १५ लाख कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळतील. सरकारकडे यासाठी पूर्ण आराखडा तयार आहे. परंतु हे लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनादेखील सरकारसोबत काम करावं लागेल," असंही ते म्हणाले. हा एक प्रोगरेसिव्ह अर्थसंकल्प आहे. यामुळे आरोग्य आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल. हा अर्थसंकल्प उत्तीर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात कोणतंही पाप नाही. हो सर्वोत्कृष्ठ अर्थसंकल्प आहे आणि कोणावरही अधिक भार येऊ नये याचा सरकारनं विचारही केल्याचा बाबा रामदेव म्हणाले.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीbudget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGovernmentसरकार