गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारात ऊना घटनेबद्दलच्या पासवान यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 15:54 IST2017-11-12T14:55:28+5:302017-11-12T15:54:28+5:30
गुजरातमध्ये भाजपच्या राजकीय वातावरण पेटले असताना आता त्यांच्या मदतीला केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आले आहेत.

गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारात ऊना घटनेबद्दलच्या पासवान यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजपच्या राजकीय वातावरण पेटले असताना आता त्यांच्या मदतीला केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आले आहेत. मात्र त्यांनी प्रचारादरम्यान ऊना येथे चार दलितांना झालेली मारहाणीच्या घटनेचा उल्लेख छोटी घटना केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीनिमित्त अहमदाबाद येथील दनीलिम्दा या राखीव मतदारसंघात प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अशा प्रकारच्या घटना बिहारमध्ये नियमित होत असतात. या घटना छोट्या-मोठ्या घटना असून ऊना येथेही अशीच एक छोटी घटना घडली होती. या घटनेवर मोठा गोंधळ उडाला होता मात्र आता सरकारचं काम हे अशा घटनांविरोधात पाऊल उचलणे हेच असते.
मेवानीने केली राजीनाम्याची मागणी
मागील वर्षी ऊन घटनेनंतर दलितांनी गुजरातमधील सरकारी कार्यालयांसमोर मृत गायी आणून ठेवल्या होत्या. या प्रकरणाची दखल गुजरातसह संपूर्ण देशभरात घेत या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. त्यांच्या या वक्तव्याने मात्र आता नव्या राजकीय वादळाला तोंड फुटले आहे. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संयोजक जिग्नेश मेवानी यांनी पासवान यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेध करत ही अत्यंत लज्जास्पद असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका घेतली आहे.