शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक बसच्या तिकिटांवर महाराष्ट्राचे चिन्ह पाहून प्रवाशांमध्ये संताप, सरकारने दिले कारवाईचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 17:55 IST

कर्नाटक बसच्या तिकिटांवर महाराष्ट्राचे चिन्ह पाहून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला.

बंगळुरू : बंगळुरूमध्ये डोनी ते गडग प्रवास करणाऱ्या बस प्रवाशांनी तिकिटांवरमहाराष्ट्र राज्य परिवहन (MRTC) चे चिन्ह पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. तिकिटावरमहाराष्ट्र परिवहनच्या चिन्हासह 'जय महाराष्ट्र' असे लिहिले होते. या संपूर्ण घटनेमुळे गडग येथे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांच्या गटाने सरकारचा निषेध केला. त्यानंतर राज्य सरकारने कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल गडग डेपोच्या परिवहन अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? डोनीहून काही प्रवासी गडगच्या दिशेने कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (NWKRTC) बसने प्रवास करत होते. यादरम्यान बसमधील कंडक्टरने प्रवाशांना जे तिकिट दिले त्यावर महाराष्ट्र परिवहन मंडळाचे चिन्ह होते. याशिवाय त्या तिकिटावर जय महाराष्ट्र असे देखील लिहले होते, यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले. याबाबतची माहिती प्रवाशांनी स्थानिक कामगार व परिवहन अधिकाऱ्यांना दिली. याशिवाय त्यांनी ही तिकिटे सोशल मीडियावर व्हायरल देखील केली आहेत. 

राज्य सरकारने दिले कारवाईचे आश्वासनहे प्रकरण तापल्यानंतर NWKRTC ने मुंद्रागी तालुक्यातील डोनी आणि गडग दरम्यानच्या मार्गासाठी 70 तिकीट रोल मागे घेतले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत NWKRTC च्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, हीच एजन्सी कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या तिकिटांचे रोल छापते. त्यामुळे ही चूक झाली आहे. या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आम्ही गडग आगाराच्या विभागीय नियंत्रकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

या घटनेवरून बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंद्रगी म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये भाषेबाबतचा वाद नेहमीच चिघळलेला असतो. हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अनेक कन्नड समर्थक गट 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव (कर्नाटक स्थापना दिवस) साजरा करण्याच्या तयारीत आहेत.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरMaharashtraमहाराष्ट्रticketतिकिटpassengerप्रवासी