शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल 100 रुपयांवर गेल्याने प्रवासी व मालवाहतूक महागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 05:56 IST

आतापर्यंतचा उच्चांक; अन्नधान्ये आणि भाज्यांचीही दरवाढ

नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या दरात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी ३५ पैशांची वाढ झाली. त्याबरोबर दोन्ही इंधनांचे दर पुन्हा एकदा उच्चांकावर गेले आहेत. डिझेलचे दर १०० रुपयांवर गेल्याने राज्यात आणि देशभर मालवाहतूकही महागली आहे. परिणामी अन्नधान्ये व भाज्या, फळे यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. ज्या ठिकाणी रिक्षा मीटरवर नाहीत, तिथे रिक्षाचालक ग्राहकांकडून जादा रक्कम मागू लागले आहेत. तसेच वडाप तसेच ग्रामीण भागांतील टॅक्सीचालक यांनीही भाड्यात वाढ केली आहे. खासगी तसेच शाळांच्या बसेसही डिझेल महागल्याने दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. टूर्स व ट्रॅव्हल कंपन्यांनी तर भाडे चार दिवसांपूर्वीच वाढवले आहे. आजच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल १०६.८९ रुपये लिटर, तर मुंबईत ११२.७८ रुपये लिटर झाले. डिझेलचे दर मुंबईत १०३.६३ रुपये, तर दिल्लीत ९५.६२ रुपये लिटर झाले.१८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सलग तिसऱ्या दिवशी प्रत्येकी ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्याआधीच्या सलग चार दिवसांतही प्रत्येकी ३५ पैसे वाढ करण्यात आली होती.भारतातील सर्व प्रमुख शहरांतील पेट्रोलचा दर आता १०० रुपयांच्या वर गेला आहे. तसेच डझनभर राज्यांत डिझेलही शंभरीपार झाले आहे. श्रीनगर आणि चेन्नई यासारख्या काही शहरांत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीनगरमध्ये डिझेल ९९.४९ रुपये लिटर, तर चेन्नईमध्ये ९९.९२ रुपये लिटर झाले आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक कर भिन्न असल्यामुळे इंधनाचे दरही भिन्न आहेत.सप्टेंबरमध्ये तीन आठवडे इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. २८ सप्टेंबरपासून दरवाढ पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हापासून पेट्रोलच्या दरात १९ वेळा, तर डिझेलच्या दरात २२ वेळा वाढ करण्यात आली आहे. या काळात पेट्रोल ५.७ रुपयांनी, तर डिझेल ७ रुपयांनी महागले आहे.१४ राज्यांत शंभरीडिझेलचा दर शंभर रुपयांपेक्षा अधिक झालेल्या राज्यांत मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, केरळ, कर्नाटक, झारखंड, गोवा आणि लडाख यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक ठिकाणी डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत इंधन दर वाढले आहेत.

टॅग्स :DieselडिझेलFuel Hikeइंधन दरवाढ