शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:41 IST

वंदे भारत ट्रेनमध्ये झांशीच्या बबीना मतदारसंघाचे आमदार राजीव सिंह त्यांच्या पत्नी आणि मुलासह दिल्लीहून झांशीला प्रवास करत होते.

नवी दिल्ली - दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या एका प्रवाशाला झांशी रेल्वे स्टेशनवर टोळक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला. भाजपा आमदार राजीव सिंह यांच्या इशाऱ्यावर समर्थकांनी ही मारहाण केल्याचा आरोप प्रवाशाने केला. आमदाराच्या सांगण्यावरून जागेची अदलाबदल न केल्याने हा प्रकार घडला. प्रवाशाने जागा न बदलल्याचा राग मनात धरून भाजपा आमदाराने समर्थकांना बोलावून प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

माहितीनुसार, राजीव सिंह हे झांशी येथील बबीना मतदारसंघातील आमदार आहेत. घटनेच्या दिवशी ते वंदे भारत ट्रेनने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलगाही होता. आमदाराला एका प्रवाशाच्या जागेवर बसायचे होते, त्यासाठी त्यांनी या प्रवाशाला जागेची अदलाबदल करण्याची मागणी केली. परंतु प्रवाशाने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आमदारांनी समर्थकांना बोलावून त्या प्रवाशाला बेदम मारले. या प्रकरणाबाबत जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी पुष्टी केली परंतु कुणीही समोर येऊन बोलण्यास तयार नाही तर आमदार राजीव सिंह यांनी मी लिखित माझी बाजू मांडेन असं सांगितले आहे. सध्या झांशी जीआरपी स्टेशनमध्ये या प्रकाराची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

वंदे भारत ट्रेनमध्ये झांशीच्या बबीना मतदारसंघाचे आमदार राजीव सिंह त्यांच्या पत्नी आणि मुलासह दिल्लीहून झांशीला प्रवास करत होते. कोचमध्ये ८ नंबरवर राजीव सिंह, पत्नी कमल सिंह ५० नंबरवर तर श्रेयांश सिंह ५१ नंबरवर अशी तिकीट होती. वंदे भारत ट्रेन झांशी रेल्वे स्टेशनवर पोहचताच १०-१२ जण ट्रेनमध्ये घुसले आणि त्यांनी ४९ नंबरवर बसलेले प्रकाश नावाच्या प्रवाशाला मारहाण केली. पुढे काही करणार इतक्यात सिग्नल सुटल्याने ट्रेन भोपाळसाठी रवाना झाली. 

दरम्यान, मध्य प्रदेशच्या पन्ना येथील काँग्रेसचे माजी आमदार मुकेश नायक आणि माजी मंत्री रामनिवास रावत यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट करून ही माहिती समोर आणली. काँग्रेसने या घटनेचा हवाला देत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला. एक वृद्ध व्यक्ती त्यांची जागा बदलण्यास नकार दिल्याने भाजपा आमदार राजीव सिंह यांच्या समर्थकांनी त्यांना बेदम मारले, त्यात त्यांच्या नाकातून रक्त आले. या प्रकारामुळे इतर प्रवाशांमध्येही दहशत पसरली. या प्रकरणावर ठोस कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसBJPभाजपा