शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती; १४ जागा, ७ विधानसभा सदस्य रिंगणात

By किरण अग्रवाल | Updated: April 14, 2024 08:31 IST

१४ जागांसाठी ७ विधानसभा सदस्य रिंगणात असून अन्यही काही ‘रेस’मध्ये आहेत. 

रांची: लोकसभेच्या अवघ्या १४ जागा असलेल्या झारखंडमध्ये विद्यमान खासदारांचे मोठ्या प्रमाणात पत्ते कापले गेले असून, आतापर्यंत ७ आमदारांवर विश्वास व्यक्त करत त्यांना खासदारकीची तिकिटे दिली गेली आहेत. एकूण जागांच्या तुलनेत या राज्यात सर्वाधिक आमदार यंदा लोकसभेत ‘प्रमोशन’साठी नशीब आजमावणार असल्याचे चित्र समोर आले आहे. 

चेहरे बदलण्याची स्पर्धाझारखंडमध्ये यंदा सर्वच पक्षांमध्ये ‘चेहरे’ बदलण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. या राज्यात भाजपाने तीन, झारखंड मुक्ती मोर्चाने दोन तर काँग्रेस व भाकपाने प्रत्येकी एका आमदाराला आतापर्यंत लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे. 

तिकिटासाठी इकडून तिकडेमहाविकास आघाडीमध्ये चतरा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवावा की राजदने, याबद्दल फैसला बाकी आहे. भाजपाचे आमदार गिरीनाथ सिंह यांनी येथील तिकिटासाठी राजदमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात अन्य जागांसाठीही  ५ ते ६ आमदार प्रयत्नशील आहेत. त्यांना तिकिटे मिळाली तर खासदारकीची निवडणूक लढणाऱ्या आमदारांची संख्या आणखी वाढेल. 

काँग्रेसचे चौघे प्रयत्नशील... धनबादमध्ये भाजपाने विद्यमान खासदार पी. एन. सिंह यांचे तिकीट कापून आमदार ढुलू महतो यांना उमेदवारी दिल्याने तेथे काँग्रेसतर्फे पूर्णिमा नीरज व अनुप सिंह हे दोन आमदार तिकिटासाठी स्पर्धेत आहेत. गोड्डाच्या जागेवरही काँग्रेसचे आमदार प्रदीप यादव व दीपिका पांडेय यांनी दावेदारी केली आहे.

दोघांत दोघे आमदार आमनेसामने... हजारीबागमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले  जयंत सिन्हा यांचे तिकीट कापून भाजपाने आमदार मनीष जयस्वाल यांना रिंगणात उतरवले आहे; तर महाआघाडीने भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार जयप्रकाशभाई पटेल यांना त्यांच्यासमोर उभे केल्याने सामना उत्कंठावर्धक होणार आहे. दुमका येथे झामुमो सोडून आलेल्या सोरेन कुटुंबातील मोठ्या सूनबाई आमदार सीता सोरेन यांना भाजपाने तिकीट दिले असून, झामुमोने त्यांच्यासमोर त्यांचे काका आमदार नलिन सोरेन यांना रिंगणात उतरवून निवडणुकीत रंग भरला आहे. 

तिकिटासाठी पक्ष सोडला, पण...- पाच टर्म खासदार राहिलेले भाजपाचे रामटहल चौधरी व आमदार जयप्रकाशभाई पटेल यांनी लोकसभेच्या तिकिटासाठी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये तर आमदार गिरीनाथ सिंह यांनी ‘राजद’मध्ये प्रवेश केला आहे.- यापैकी फक्त पटेल यांनाच तिकीट मिळाले आहे. रांचीच्या जागेवर काँग्रेसतर्फे चौधरी यांनी दावेदारी केली आहे. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोधकांत सहाय तेथे अगोदरपासून दावेदार असल्याने निर्णय प्रलंबित आहे.

टॅग्स :Jharkhandझारखंडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MLAआमदारMember of parliamentखासदार