शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमीला झालेल्या दंगलीत सहभाग; 12 वर्षीय मुलाला ठोठावला 2.9 लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 14:07 IST

मध्य प्रदेशातील खरगोन येथील दंगलीशी संबंधित प्रकरणात मुलावर दंडात्मक कारवाई झाली आहे.

मध्य प्रदेशातील खरगोन येथील दंगलीशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या दंगलींमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. दंगलग्रस्तांची तक्रार ऐकून न्यायाधिकरणाने एका 12 वर्षीय मुलाला नोटीस बजावली आहे. यामध्ये दंगलीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी 2.9 लाखांचा दंडही ठोकला आहे. दंगलीच्या वेळी आरोपी मुलगा 11 वर्षांचा होता. मुलावर तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा आरोप आहे. 

ऑगस्ट 2022 मध्ये एका महिलेने मध्य प्रदेश प्रिव्हेंशन अँड रिकव्हरी ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाकडे तक्रार केली होती. दंगलीत तिच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप महिलेने केला होता. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून मुलगा आणि इतर सात जणांना नोटीस बजावली.

रामनवमीला हिंसाचारमध्य प्रदेशातील खरगोनमध्ये यावर्षी रामनवमीच्या दिवशी दोन समुदायांमध्ये वाद होऊन दंगल उसळली होती. या दंगलीत नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. याची भरपाई करण्यासाठी मध्य प्रदेश प्रिव्हेंशन अँड रिकव्हरी ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. यानंतर दंगलीला बळी पडलेल्या एका महिलेने ऑगस्ट महिन्यात येथे तक्रार दाखल केली होती. यानंतर मुलासह सात जणांना नोटीस बजावण्यात आली.

2.9 ​​लाख रुपये दंडया नोटीसमध्ये मुलाचे वयही नमूद करण्यात आले आहे. यासोबतच त्याच्यावर 2.9 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एनबीटीच्या अहवालानुसार, न्यायाधिकरणाचे सदस्य प्रभात पाराशर यांनी सांगितले की, ही कारवाई नियमांनुसार करण्यात आली आहे. हा फौजदारी खटला असता तर बालकाला बाल न्याय कायद्याचे संरक्षण मिळाले असते. म्हणून आम्ही फक्त दंडात्मक कारवाई केली आहे. मुलाच्या पालकांनी याबाबत जबाबदारी घेतली असल्याने, ते पैशांची भरपाई करणार आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस