पायरसीप्रकरणी सेन्सॉर बोर्डातील कर्मचा-यांना अटक
By Admin | Updated: July 27, 2015 15:29 IST2015-07-27T15:27:25+5:302015-07-27T15:29:04+5:30
नवीन चित्रपटांच्या पायरसीमध्ये आता सेन्सॉर बोर्डातील कर्मचारीच सहभागी असल्याचे समोर आले आहे.

पायरसीप्रकरणी सेन्सॉर बोर्डातील कर्मचा-यांना अटक
ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. २७ - नवीन चित्रपटांच्या पायरसीमध्ये आता सेन्सॉर बोर्डातील कर्मचारीच सहभागी असल्याचे समोर आले आहे. एका मल्याळम चित्रपटाच्या पायरेटेड कॉपीच्या आधारे तिरुअनंतपुरम पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
प्रेमम या मल्याळम चित्रपटाच्या पायरेटेड कॉपीप्रकरणी तिरुअनंतरपुरम पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. या पायरेटेड कॉपीवर 'सेन्सॉर बोर्ड कॉपी' असा उल्लेख होता. या आधारे पोलिसांनी सेन्सॉर बोर्डमधील कर्मचा-यांची कसून चौकशी केली. या चौकशीत सेन्सॉर बोर्डात कंत्राटी पद्धतीवर काम करणा-या तिघा जणांना अटक केली. अरुण कुमार, निधीन व कुमारन अशी या अटक केलेल्या तिघा कर्मचा-यांची नावे आहेत.