पर्रीकरांचे उत्तराधिकारी राजेंद्र आर्लेकर ?

By Admin | Updated: November 6, 2014 03:59 IST2014-11-06T03:59:55+5:302014-11-06T03:59:55+5:30

केंद्रीय मंत्रिमंडळात मनोहर पर्रीकर यांचा समावेश होण्याची दाट शक्यता असून मुख्यमंत्री पर्रीकर यांचे उत्तराधिकारी म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर यांचे नाव आघाडीवर आहे.

Parrikar's successor Rajendra Arlekar? | पर्रीकरांचे उत्तराधिकारी राजेंद्र आर्लेकर ?

पर्रीकरांचे उत्तराधिकारी राजेंद्र आर्लेकर ?

पणजी : केंद्रीय मंत्रिमंडळात मनोहर पर्रीकर यांचा समावेश होण्याची दाट शक्यता असून मुख्यमंत्री पर्रीकर यांचे उत्तराधिकारी म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर यांचे नाव आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे दोन्ही नेते देखील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असले, तरी भाजपाकडून आर्लेकर यांनाच झुकते माप दिल्याची चिन्हे आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
आर्लेकर व पार्सेकर हे दोघेही एकाचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून राजकारणात आले आहेत. उपमुख्यमंत्री डिसोझा यांचा संघाशी अजिबात संबंध नाही. पार्सेकर हे पर्रीकर यांच्या विश्वासातील मानले जातात.
पण आर्लेकर यांच्याशीही पर्रीकर यांचे चांगले संबंध आहेत. आर्लेकर यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवून एक वेगळा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न भाजपा करू पाहत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. (खास प्रतिनिधी)

Web Title: Parrikar's successor Rajendra Arlekar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.