संरक्षण उत्पादन क्षेत्रात लवकरच भरीच सुधारणा पर्रीकर यांची ग्वाही
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:19+5:302015-02-06T22:35:19+5:30
पणजी : संरक्षण उत्पादन क्षेत्रात लवकरच भरीव सुधारणा करण्यात येतील आणि येत्या काही महिन्यांत याबाबतची घोषणा केली जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शुक्रवारी सांगितले़

संरक्षण उत्पादन क्षेत्रात लवकरच भरीच सुधारणा पर्रीकर यांची ग्वाही
प जी : संरक्षण उत्पादन क्षेत्रात लवकरच भरीव सुधारणा करण्यात येतील आणि येत्या काही महिन्यांत याबाबतची घोषणा केली जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शुक्रवारी सांगितले़गोव्यातील एका गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते़ आम्ही गोव्याचे नेतृत्व स्वीकारले होते तेव्हा राज्यातील औद्योगिक वातावरण नकारात्मक होते़ कारण लोकांना अनेक प्राधिकरणांचे उंबरठे झिजवावे लागायचे़ संरक्षण उत्पादन क्षेत्रातही आम्हाला अशीच मानसिकता आढळून आली आहे़ आम्ही प्राधान्याने संरक्षण उत्पादनाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केले असून येत्या काही महिन्यात चित्र बदललेले असेल, असे पर्रीकर यावेळी म्हणाले़ अर्थात याबाबत तपशीलवार माहिती देण्यास त्यांनी नकार दिला़अनेक विद्यमान नियमांमुळे देशाच्या सीमांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे़ देशाची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे़ देशाच्या शत्रूंना तुमच्या कायदे-नियमांशी काहीही देणेघेणे नाही, असे सांगत संरक्षण योजनांसाठी योग्य कायदे असायला हवे, यावर त्यांनी भर दिला़