शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Parliament Winter Session: 'संसदेत आठवड्यातून एक दिवस फक्त विरोधकांना बोलण्याची संधी मिळावी'- शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 21:03 IST

Winter Session of Parliament: 'यामुळे बोलण्याची संधी मिळत नसल्याची विरोधकांची तक्रार दूर करता येईल.'

Winter Session of Parliament 2022: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी संसदेच्या सर्व विभागांशी संबंधित स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीत समित्यांच्या कारभारात सुधारणा करण्याबरोबरच संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे चालवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला राधामोहन सिंग, जगदंबिका पाल, सुशील मोदी आणि इतर नेते यांच्यासह काँग्रेस नेते शशी थरूरही उपस्थित होते. थरूर हे रसायन आणि खते मंत्रालयाशी संलग्न असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस फक्त विरोधकांना बोलण्याची संधी मिळावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

हिवाळी अधिवेशन कधी होणार?संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अधिवेशन काळात दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अनेकदा गदारोळ होऊन त्याचा परिणाम संसदेच्या कामकाजावर होतो. आपल्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस सातत्याने करत आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली.

बैठक कशासाठी घेतली?यावेली बोलताना शशी थरूर यांनी सुचवले की विरोधकांना बोलण्याची पुरेशी संधी मिळावी यासाठी अधिवेशनात आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा, ज्यावर फक्त विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलण्याची संधी मिळेल. असे करून बोलण्याची संधी मिळत नसल्याची विरोधकांची तक्रार दूर करता येईल.

बैठकीत जगदीप धनखर यांनी स्थायी समित्यांच्या कामकाजात अधिक सुधारणा करण्यासाठी सर्व सभापतींशी संवाद साधला. बैठकीत उपस्थित नेत्यांनी सांगितले की, स्थायी समितीच्या बैठकांमध्ये सर्वच पक्षांचे खासदार प्रामाणिकपणे आपले म्हणणे मांडतात आणि बहुतांश विषयांवर एकमतानेच अहवाल तयार केला जातो. स्थायी समित्यांच्या कामकाजावर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश असल्याचे बैठकीत उपस्थित एका नेत्याने सांगितले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस