शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

Parliament Winter Session: जया बच्चन म्हणाल्या, "सर सर म्हणत ओरडत आहे, आता मी तुम्हाला मॅडम म्हणेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 16:17 IST

सकाळपासून आरडाओरडा करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे. 

Parliament Winter Session  ( Marathi News ) : नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी आणि खासदारांचे निलंबन या दोन मुद्द्यांवरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या (20 डिसेंबर) 13 व्या दिवशीही गदारोळ झाला. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी म्हटले आहे की, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आपले ऐकत नाहीत. सकाळपासून आरडाओरडा करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे. 

खासदारांना कोणत्या निकषाखाली निलंबित करण्यात आले, यावरही जया बच्चन यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, दुसऱ्याच दिवशी अनेक खासदार वेलमध्ये गेले, पण त्यांना निलंबित करण्यात आले नाही, त्यामुळे कोणत्या निकषावर खासदारांना निलंबित केले जात आहे, हे सभापतींनी सांगावे. "आम्ही बोलतोय, आम्ही ओरडतोय की सर, आम्हाला बोलू द्या. मी त्यांना म्हणाले की, सर-सर म्हणत आहे आणि ते उत्तर देत नाहीत. आता मी तुम्हाला मॅडम म्हणेन", असे जया बच्चन गमतीने म्हणाल्या. 

पुढे म्हणाल्या की, "काल तुम्ही अनेक खासदारांना निलंबित केले. कोणी फलक धरले तर कोणी वेलमध्ये गेले. आजही अनेक लोक वेलमध्ये गेले, त्यांना तुम्ही निलंबित का केले नाही? त्यामुळे यांना निलंबित करायचे, त्यांना करायचे नाही, यामागील तुमचा निकष काय आहे, असे मी सभापतींना विचारत होते." याचबरोबर, जया बच्चन म्हणाल्या, 'जरा विचार करा, राम गोपालसारखे ज्येष्ठ खासदार आपल्या जागेवरून उठले आणि बाजूला गेले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी कधीही मोठ्याने आवाज केला नाही, वाईट बोलले नाहीत किंवा सभापतींनी त्यांची वेळ संपल्याचे सांगितल्यावर ते भाषण पूर्ण न करता बसले आहेत. अशा ज्येष्ठ खासदाराला तुम्ही निलंबित केले आहे. याचा विचार करा. हा कोणता निकष आहे? असा सवाल जया बच्चन यांनी केला.

खासदाराने केली उपराष्ट्रपतींची मिमिक्रीसंसदेत झालेल्या घुसखोरीवरून आक्रमक भूमिका मांडणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा सपाटा सुरू आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत मागील काही दिवसांत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात काल विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनादरम्यान टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. कल्याण बॅनर्जी यांनी सभापतींची मिमिक्री केली, त्यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. राहुल गांधी या मिमिक्रीचा व्हिडिओ काढताना दिसले. आज संसद परिसरात राहुल गांधी दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी सदर प्रकरणावर प्रश्न विचारला. यावर मी यावर भाष्य करणार नाही, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाJaya Bachchanजया बच्चन