शहरं
Join us  
Trending Stories
1
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
2
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
3
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
4
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
6
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
7
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
8
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
9
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
10
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
11
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
12
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
13
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
14
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
15
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
16
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
17
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
18
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
19
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे

'सरकारला प्रश्न विचारल्यानं खासदारांना निलंबित केलं'; शरद पवारांनी कारवाई मागचं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 1:28 PM

संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Parliament Winter Session 2023 ( Marathi News ) : नवी दिल्ली-  संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून १४३ खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनीही यावरुन भाजपवर जोरदार टीका करत कारवाई मागचं कारण सांगितलं.

"संसदेचे सदस्य नसताना काही लोक सदनमध्ये आले, या लोकांना पास कुठून मिळाला. ते सदनमध्ये कसे आले? याबाबत सरकारकडून माहिती मिळण्याची आवश्यक्ता होती. सदनचा तो अधिकार होता, आम्ही स्टेटमेंटची मागणी केली होती तेच त्यांनी दिलेली नाही. यामुळेच सदनमधील सदस्यांना निलंबित केलं, आजपर्यंत अशी गोष्ट कधीही झालेली नाही, असा आरोप खासदार शरद पवार यांनी आज केला. 

उच्च शिक्षण मंत्र्यांना न्यायालयाचा दणका! के पोनमुडी यांना ३ वर्षांची शिक्षा, ५० लाखांचा दंड!

खासदार शरद पवार म्हणाले, सध्या विरोधी पक्षाला दुर्लक्ष करुन काम करणे सुरू आहे. पण, देशाची जनता हे सर्व पाहत आहे. जी मिमिक्री केली ती सदनच्या बाहेर केली आहे. संसदेत बोलू दिले जात नाही. खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केलं. खासदारांचं असं निलंबन करणं चुकीचं आहे, असंही खासदार पवार म्हणाले. 

"निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही"

लोकसभेने आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन केले आहे. या खासदारांविरोधात आता आणखी एक कारवाई केली आहे. मंगळवारी लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास मनाई केली आहे.

लोकसभेतून एकूण ९५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर ४६ खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. संसदेच्या कामकाजानंतर, इंडिया आघाडीने शुक्रवारी देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाच्या मागणीवर ठाम आहेत आणि गदारोळ माजवत आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसParliamentसंसद