शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संसदेचे विशेष अधिवेशन: आधी या मुद्द्यांवर चर्चा करा..; सोनिया गांधी PM मोदींना लिहिणार पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 09:37 IST

संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार

Parliament Special Session: संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा मुख्य अजेंडा सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. या दरम्यान, काँग्रेससंसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहणार आहेत. काँग्रेस पक्ष कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा करण्याची अपेक्षा ठेवते या संदर्भात हे पत्र असणार आहे. काँग्रेसच्या संसदीय रणनीती समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसने हा निर्णय विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांना कळवला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची छोटेखानी बैठक झाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने खरगे यांनी सभागृहातील  सर्व नेत्यांच्या सह्या घेऊन विरोधी आघाडीच्या वतीने पत्र लिहावे, असे काही नेत्यांनी सांगितले. पण सोनिया गांधींनी सर्व पक्षांच्या वतीने लिहावे, अशी काँग्रेसची इच्छा होती, त्यावर अखेर इतर पक्षांनी सहमती दर्शवली.

'हे' मुद्दे सभागृहात मांडण्यावर भर

एका विरोधी पक्षनेत्याने मात्र स्पष्ट केले की, हे संयुक्त पत्र किंवा I.N.D.I.A. आघाडीचे पत्र नाही. काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या लेटरहेडवर हे पत्र लिहतील. या पत्रात सोनिया गांधी महागाई, बेरोजगारी, मणिपूरची परिस्थिती, अदानी प्रकरणातील ताजे खुलासे, चीनसोबतचा सीमेवरील संघर्ष आणि फेडरल रचनेवरील हल्ले या मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करतील असे मानले जाते. विशेष अधिवेशनात हे मुद्दे सभागृहात मांडण्यावर विरोधी पक्षांमध्ये एकमत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एक राष्ट्र, एक निवडणूक आणि भारत हे नाव या कल्पनेतून राजकीय वाद वाढत असताना, १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारला अद्याप स्पष्ट करायचा नसल्याने काँग्रेस प्रतिवाद प्रस्थापित करू पाहत आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी