शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींना 73 वेळा तर राहुल गांधींना फक्त 6 वेळा दाखवलं; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 20:07 IST

संसद टीव्हीवर दोन्ही नेत्यांना दाखवण्यावरुन काँग्रेसने टीका केली आहे.

Parliament Session 2024 : आज(27 जून) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारच्या कामांची माहिती देण्यासोबतच 1975 मध्ये काँग्रेसने देशात लागू केलेल्या आणीबाणीचाही उल्लेख केला. दरम्यान, आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी संसद टीव्हीवर पंतप्रधान मोदींना वारंवार दाखवले गेल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर आरोप केला की, राष्ट्रपती मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावेळी पंतप्रधान मोदींना 73 वेळा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फक्त 6 वेळा दाखवण्यात आले.

त्यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "राष्ट्रपतींच्या 51 मिनिटांच्या अभिभाषणात कोणाला किती वेळा दाखवले गेले? सभागृह नेते नरेंद्र मोदी यांना 73 वेळा, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 6 वेळा दाखवण्यात आले. सरकारमधील नेत्यांना 108 वेळा, तर विरोधी नेत्यांना 18 वेळा दाखवले गेले. संसद टीव्ही सभागृहाचे कामकाज दाखवण्यासाठी आहे, कॅमेराजीवींसाठी नाही," अशी बोचरी टीका त्यांनी केली.

मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर लिहिले की, "मोदी सरकारने लिहिलेले राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकून असे वाटले की, पीएम मोदी निकाल मान्य करायला तयार नाहीत. देशातील जनतेने त्यांच्या 400 पारच्या नाऱ्याला नाकारले आणि भाजपला 272 च्या आकड्यापासून दूर ठेवले," अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा