शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

6 मोबाईलमध्ये संसदेतील कटाचे धागेदोरे; फोन घेऊन पळालेला मास्टरमाईंड उलगडणार रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 3:25 PM

चारही आरोपींचे मोबाईल ललितकडे असून तो अद्याप फरार आहे. मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तो सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींची सतत चौकशी सुरू आहे. बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या आणि मणिपूरच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे सर्व केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र तपास यंत्रणा यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. आरोपींच्या मोबाईलची सविस्तर तपासणी करून त्यांचा नेमका काय हेतू आहे, याचा शोध घेतला जाईल. चारही आरोपींचे मोबाईल ललितकडे असून तो अद्याप फरार आहे. मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तो सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमोलने पोलिसांना सांगितलं की त्याने कल्याण येथून 1200 रुपयांना पाच रंगीत धूराचे स्प्रे विकत घेतले होते. सर्व आरोपींची विचारधारा एक सारखीच आहे. त्यामुळे त्यांनी सारख्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांना कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही संस्थेने पाठवलं होतं का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

या प्रकरणातील मास्टरमाईंडचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी छापेमारी केली जात आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कोलकाता येथील रहिवासी असलेला ललित झा हा शिक्षक असून तो या संपूर्ण घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की ते सोशल मीडियावर एकमेकांच्या संपर्कात आले होते, त्यानंतर सहाही जण फेसबुकवरील भगतसिंग फॅन पेजशी जोडले गेले.

ललित, सागर शर्मा आणि मनोरंजन वर्षभरापूर्वी म्हैसूरमध्ये भेटले होते, जिथे त्यांनी संसदेत प्रवेश करण्याची योजना आखली होती. नंतर त्याने नीलम आणि अमोल यांनाही सामील करून घेतले. या संपूर्ण प्रकरणाचे नेतृत्व ललित याने केलं. ललितचं शेवटचे लोकेशन राजस्थान-हरियाणा सीमेवरील नीमराना येथे सापडले. पोलिसांनी आधी सांगितले होते की, पाचही जण दहा डिसेंबरला जमले होते आणि गुरुग्राममधील विशाल शर्माच्या घरी थांबले होते. सध्या नीलम, मनोरंजन, अमोल आणि विशाल हे अटकेत आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी त्याची चौकशी केली. 

ललित झा याने सर्वांना गुरुग्राममध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं. त्याने मोबाईलवर व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला होता. सध्या ललित झा हा या सर्वाचा सूत्रधार असल्याचं दिसत आहे. उर्वरित चौघे ललितच्या संपर्कात होते. सुनियोजित कटाचा भाग म्हणून ललित सर्वांचे फोन घेऊन फरार झाला. ललित मोबाईलमधील कटाशी संबंधित पुरावे नष्ट करू शकतो, अशी भीती पोलिसांना आहे. ललित झा याचं शेवटचं लोकेशन नीमरानाजवळ होतं.  

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभा