शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 20:10 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

नवी दिल्ली- सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर गदारोळ सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने सुरू असलेल्या गदारोळामुळे भाजप नेत्याने त्यांच्यावर सडकून टीका केली. विरोधी पक्ष संसदेत मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत. सरकारकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत, हे माहीत असल्याने विरोधी पक्षांना चर्चेत रस नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 

मणिपूरमधील घटनेबाबत विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीतील नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले. मणिपूर प्रकरणावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांनी पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा करावा, असेही म्हटले. 

सरकार चर्चेसाठी तयार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार आहे. मणिपूरला जाऊन आलेले गृहमंत्री अमित शहा उत्तर देण्यास तयार आहेत. विरोधकांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेच मला समजत नाही. 

अमित शहा उत्तर देण्यास तयार भाजप नेते सुशील मोदी यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षाचे नेते मणिपूर जाऊ शकतात, राष्ट्रपतींना भेटू शकतात, परंतु या मुद्द्यावर संसदेत होणाऱ्या चर्चेत भाग घेऊ शकत नाहीत. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारकडे आहेत, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे, यामुळेच ते संसदेतील चर्चेपासून दूर पळत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा