शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली'; अमित शहांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 19:22 IST

'वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले.'

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर 8-10 ऑगस्टदरम्यान चर्चा होणार आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. यावेळी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपाने 9 वर्षांत 9 सरकारे पाडल्याचा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपाच्या काळात महागाई वाढली. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी झाले. मोदी सरकारच्या काळात दुध महागले. जगातील अनेक यादीत भारताची घसरण झाली. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचे सर्वांत मोठे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. वंदे भारत ट्रेन गरिबांसाठी नाही. मी वंदे भारतच्या विरोधात नाही, मात्र हे सत्य नाकारता येणार नाही. सरकारने त्यांच्या 9 वर्षांच्या काळात 9 सरकारे पाडली, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

अमित शहांचे प्रत्युत्तरदरम्यान, आज(दि.9) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अविश्वास प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर एकापाठोपाठ एक घणाघाती टीका केल्या. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मणिपूर हिंसाचारापासून काँग्रेसच्या भ्रष्टाचारापर्यंत अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांना घेतले. 

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आरोपांचेही उत्तर दिले. शहा म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही 9 वर्षात 9 सरकारे पाडली. पण, महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे काम सर्वात पहिले शरद पवारांनी केले. त्यांनीच वसंतदादा पाटलांचे सरकार पाढून जनसंघसोबत सरकार स्थापन केले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.

काँग्रेसवर घणाघाती टीकायावेळी शहांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत खंत व्यक्त करताना दिलेल्या रुपयाचे उदाहरण देत काँग्रेसची कोंडी केली. शह म्हणाले की, एकदा या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं होतं की, मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यातील केवळ 15 पैसेच पोहोचतात. तेव्हा ते नवीनच राजकारणात आले होते, प्रामाणिक व्यक्ती होते, बोलून गेले. पण मी आता पुढे विचारतो की, ते 85 पैसे पळवायचा कोण, असा टोला अमित शह यांनी लगावला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारParliamentसंसदlok sabhaलोकसभा