शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गळाभेट आणि गळ्यात पडण्यातला फरक कळला; मोदींचा राहुलना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाला संबोधित करत आहेत. ते म्हणाले, 2014ला मी पहिल्यांदा खासदार झालो.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाला संबोधित करत आहेत. ते म्हणाले, 2014ला मी पहिल्यांदा खासदार झालो. त्यामुळे मला लोकसभेतल्या गल्ल्या, दरवाजे आणि नियमांची माहिती नव्हती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. लोकसभेत पहिल्यांदाच आल्यानंतर गळाभेट आणि गळ्यात पडणं यात काय फरक असतो, ते मला समजलं. पहिल्यांदाच पाहिलं की, सभागृहात डोळे मारले जातात. मी ऐकलं होतं की भूकंप येतो. परंतु कोणताही भूकंप आलेला नाही. बऱ्याचदा विमानं उडवली गेली, परंतु लोकशाहीची मर्यादा आणि उंची एवढी मोठी आहे की, विमानंही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत.या सभागृहानं 1400हून अधिक कायदे संपवले. कायद्यांचंही एक जंगल झालं होतं. ही तर सुरुवात आहे, अजून बरीच कामं करायची आहेत. त्यासाठी मुलायम सिंह यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. यावेळी मोदींनी राफेल करारावरही भाष्य केलं. सध्याच्या एनडीए सरकारने केलेला राफेल विमानांचा करार हा आधीच्या यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच मोदी सरकारने 126 विमानांच्या तुलनेत 36 विमानांसाठी करार करताना एकूण 17.08 टक्के पैसे वाचवले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल विमानांसाठी करार केला होता. त्याआधी यूपीए सरकारच्या काळात 126 विमानांसाठी करार झाला होता. मात्र त्यावेळी अनेक मुद्द्यांवर एकमत न झाल्याने हा करार बारगळला होता.मात्र कॅगचा अहवाल सादर होण्यापूर्वीच काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 141 पानांचा कॅगचा अहवाल राज्यसभेत सादर झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करावे लागले.  तर लोकसभेमध्ये टीडीपी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातल्याने कामकाज स्थगित करावे लागले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधी