शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"संसद म्हणजे कुस्तीचा आखाडा नाही, आमच्या खासदारानं राहुल गांधींवर...!" किरेन रिजिजू संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:30 IST

"तुम्ही (राहुल गांधी) इतर खासदारांना मारण्यासाठी कराटे-कुंगफू शिकलात का?"

संसद परिसरातील हाणामारीवरून आता राजकारण तापताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या दोन खासदारांना धक्काबुक्की केली, असा आरोप भाजपने केला आहे. मात्र, काँग्रेसने भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे. यातच, संसद म्हणजे कुस्ती आणि स्मार्टनेस दाखवण्याचे व्यासपीठ नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

'आमच्या खासदाराने हात उचलला असत तर...?' -रिजिजू म्हणाले, "राहुल गांधींनी शारीरिक ताकद दाखवली. त्यांनी आमच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केली. आमच्या खासदारांनीही हात उचलला असता तर काय झाले असते? तुम्ही (राहुल गांधी) इतर खासदारांना मारण्यासाठी कराटे-कुंगफू शिकलात का?" राहुल गांधींनी भाजपचे दोन खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना जोरदार धक्काबुक्की केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. 

भाजप खासदारांनी संयम दाखवला -केंद्रीय मंत्री रिजिजू पुढे म्हणाले, "राहुल गांधींना कोणत्या कायद्याने दुसऱ्या खासदाराला धक्का-बुक्की करण्याचा अधिकार दिला? जर प्रत्येकाने आपली ताकद दाखवून हाणामारी करायला सुरुवात केली, तर संसदेचे कामकाज कसे चालेल. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. आम्ही संयम दाखवला आहे. भाजप-एनडीएचा कुठलाही खासदार धक्का-बुक्की करत नाही. ते आपली बाजू मांडतात... लोकशाहीत सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिका आहे.

"खासदार आपापल्या विचारांना घेऊन संसद परिसरात आंदोलन करत असतात. काँग्रेस आणि I.N.D.I.A.चे लोक रोज निदर्शने करत असतात. आज एनडीएच्या खासदारांनी निदर्शन केले. कारण, काँग्रेस स्वातंत्र्याच्या काळापासून ते आत्तापर्यंत बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा अवमान करत आली आहे आणि आता संसदेच्या आत आणि बाहेरही खोटे बोलून गृहमंत्री अमित शहा यांचा  व्हिडिओ कापून पसरवला," असेही केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधी