शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

संसदेचे अधिवेशन संपले; आता संघर्ष रस्त्यावर! मोदींच्या गॅरंटीची गाडी भाजप प्रत्येक घरी पोहोचवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 6:07 AM

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या संसद अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. आता संघर्ष संसदेऐवजी रस्त्यांवर लढला जाणार आहे.

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीची गाडी प्रत्येक घरी पोहोचवण्याबरोबरच काँग्रेस व विरोधकांच्या कारभाराचा पर्दाफाशही प्रत्येक घरी पोहोचवण्याचे काम आता भाजप करणार आहे. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या संसद अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. आता संघर्ष संसदेऐवजी रस्त्यांवर लढला जाणार आहे. हे संसदेचे अधिवेशन ऐतिहासिक ठरले. कारण, आजवर कोणत्याही संसद अधिवेशनात एवढ्या मोठ्या संख्येने खासदार कधीही निलंबित करण्यात आले नव्हते. संसदेऐवजी आता देशातील रस्ते रणक्षेत्र होणार आहेत. दोन महिन्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट् ट्रिक करण्यासाठी मैदानात उतरत आहेत तर काँग्रेस व विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून टक्कर देण्याची तयारी करीत आहेत.

१ जानेवारीपासून भाजप व केंद्र सरकार संपूर्ण देशात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची मोहीम उघडत आहे. यातून जनतेपर्यंत जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

‘भाजप’ची निवडणुकीची तयारी सुरू 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यांत मिळालेल्या विजयाने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. भाजप आता अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची मोहीम उघडत आहे. २०२४च्या निवडणुकीचाही हाच अजेंडा असणार आहे. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ प्रत्येक घरी नेण्यासाठीची मोहीम आधीच सुरू केलेली आहे. ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

राहुल गांधी यांच्यावर सर्वांच्या नजरासर्व नजरा राहुल गांधी यांच्यावर आहेत. राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहे. भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांचा एकच उमेदवार उतरवून विरोधकांची मते विभागली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  रस्त्यांवर उतरण्याची रणनीती भाजपकडूनही सुरू आहे.

‘इंडिया’ आघाडीत अडथळा काय?इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी प्रस्ताव आल्याने काँग्रेसबरोबरच सर्व विरोधी पक्षांचे नेते आश्चर्यचकीत झाले होते. विरोधकांचा नेता कोण होणार, ही इंडिया आघाडीची सर्वांत कमजोरी राहिली आहे तर जागावाटपाची दुसरी मोठी समस्या आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन