शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Parliament Building Inauguration: संसदेच्या उद्घाटनावर कुणी शवपेटीशी तुलना केली, तर कुणी कलंक म्हटले; विरोधकांच्या प्रतिक्रीया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 13:49 IST

New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले.

New Parliament Building nauguration: देशातील नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे रविवारी (२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या भव्यदिव्य सोहळ्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व 775 खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी सेंगोल (राजदंड) सभागृहात बसवला. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते. 

    

जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. दरम्यान, संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन देशात राजकारण सुरू आहे. काँग्रेस, TMC, AAP, NCP, DMK यांसह २१ पक्षांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे, तर NDA आणि NDA त नसलेल्या 28 पक्षांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. उद्घाटनानंतर समर्थक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

पीएम मोदी काय म्हणाले? उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, आजचा दिवस आपल्या सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणारी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ही भव्यदिव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणाबरोबरच देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवीन गती आणि शक्ती देईल.'

ओम बिर्ला म्हणाले...लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण हा आपल्या लोकशाही इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. लोकशाहीचे हे नवे मंदिर एकता, अखंडता, समता, न्याय आणि बंधुत्वाची भावना दृढ करून देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले, ऐतिहासिक क्षण! 'न्यू इंडिया'च्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रतीक असलेले भव्य, वैभवशाली आणि प्रेरणादायी नवीन संसद भवन आज आदरणीय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले आहे. सर्व देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन!

राहुल गांधींचा टोलानवीन संसदेच्या उद्घाटनानंतर राहुल गांधींनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले की, संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत.

आप नेत्याची जहरी टीका

आप आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्र्याने म्हटले की, एका सम्राटाने मुमताजला ताजमहालमध्ये पुरले होते आणि संपूर्ण जग ते पाहण्यासाठी येते. आज एका सम्राटाने संविधानाला पुरले, ते पाहण्यासाठी लोक नक्कीच येतील.

जेडीयूने संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन देशासाठी कलंक असल्याचे म्हटले आहे. JDU MLC नीरज कुमार म्हणाले, नवीन संसदेचे उद्घाटन म्हणजे हुकूमशाही आणि मोदींचा इतिहास देशात लागू केला जात आहे. नव्या संसदेच्या माध्यमातून देशाला कलंक लावण्याचा इतिहास लिहिला जात आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या..राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधकांच्या उपस्थितीशिवाय संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पूर्ण होऊ शकत नाही. हा एक अपूर्ण कार्यक्रम आहे, याचा अर्थ देशात लोकशाही नाही. विरोधी पक्षातील नेत्यांशी ते फोनवर संपर्क साधू शकत होते. जुन्या संसद भवनाशी आमच्या आठवणी जोडलेल्या आहेत. जुने संसद भवन, हाच भारताच्या स्वातंत्र्याचा खरा इतिहास आहे.

आरजेडीची वादग्रस्त टीकाराष्ट्रीय जनता दलाने नवीन संसद भवनाबाबत एक वादग्रस्त ट्विट केले असून त्यात त्याची तुलना शवपेटीशी करण्यात आली आहे. आरजेडीने एक चित्र ट्विट केले आहे, ज्यामध्ये एका बाजूला नवीन संसद भवन आहे, तर दुसऱ्या बाजूला शवपेटीचे चित्र आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदom birlaओम बिर्लाcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाRahul Gandhiराहुल गांधी