शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"तुम्ही JPCची मागणी सोडा, आम्ही राहुल गांधींच्या माफीची मागणी सोडू', काँग्रेसचा केंद्रावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:23 IST

Parliament Budget Session: काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय गदारोळादरम्यान काँग्रेसने केंद्रावर ऑफर दिल्याचा आरोप केला आहे.

Congress Vs BJP: लंडनमधील वक्तव्यामुळे भाजप राहुल गांधींच्या माफीवर ठाम आहे. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजावर मोठा परिणाम पडत आहे. या गोंधळादरम्यान काँग्रेसने केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. 'काँग्रेसने जेपीसीची मागणी सोडली तर भाजप राहुल गांधींच्या माफीची मागणी करणार नाही', अशी ऑफर केंद्राने दिलाचा खुलासा काँग्रेसने केला आहे.

या बाबात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "पंतप्रधानांच्या अदानी घोटाळ्यात जेपीसीची विरोधकांची मागणी भाजपच्या निराधार आरोपांवर आधारित राहुल गांधींच्या माफीशी कशी जोडली जाऊ शकते?"

रमेश पुढे म्हणतात, "जेपीसीची मागणी तथ्ये आणि कागदपत्रांच्या आधारे उघडकीस आलेल्या घोटाळ्यासाठी आहे. अदानी प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप राहुल गांधींच्या माफीची मागणी करत आहे,' असे रमेश म्हणाले. याशिवाय, जेपीसीची मागणी वगळण्याचा आणि राहुल गांधींनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काँग्रेसकडून म्हटले जात आहे. 

अदानी प्रकरणावर जेपीसीची मागणी काँग्रेस अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याची मागणी करत आहे, तर भाजप काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या माफीवर ठाम आहे. काँग्रेस आणि भाजपमधील या राजकीय भांडणामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा विस्कळीत होत आहे. दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू झाला, मात्र गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सुरू होऊ शकले नाही. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार असून त्यापूर्वी 23 मार्च रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प मंजूर होणार आहे. आता तो चर्चेविना मंजूर होईल, असे मानले जात आहे

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी