पारगाव ते वेळेश्वर पायी दिंडी सोहळा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:25+5:302015-02-18T00:13:25+5:30
पेठ : महाशिवरात्रीनिमित्त सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील भक्तांनी पारगाव ते श्रीक्षेत्र वेळेश्वर देवस्थानपर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे हे बारावे वर्ष असून, या दिंडीस भक्तांनी मोठा दिला.

पारगाव ते वेळेश्वर पायी दिंडी सोहळा
प ठ : महाशिवरात्रीनिमित्त सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील भक्तांनी पारगाव ते श्रीक्षेत्र वेळेश्वर देवस्थानपर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे हे बारावे वर्ष असून, या दिंडीस भक्तांनी मोठा दिला. सकाळी ९.३० वाजता पारगाव येथून या दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. पारगाववरून पुढे पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी ते वेळेश्वर देवस्थान, असा दिंडीने प्रवास केला. दिंडी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सारेच भक्त दिंडीत सहभागी होऊन आनंदाने भजन गात वाटचाल करीत होते. सातगाव पठारचे आराध्यदैवत श्रीक्षेत्र वेळेश्वर हे असल्याने या दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक गावातील भक्तगण प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक गावात दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्तांना रस्त्यात प्रत्येकी ठिकाणी फराळाच्या पदार्थाचे वाटप करण्यात आले. दिंडी सोहळ्यातील भक्तगण श्रीक्षेत्र वेळेश्वर येथे रात्री मुक्काम असून, दुसर्या दिवशी अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. तुळशीराममहाराज सरकटे यांचा काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.फोटो ओळ : १) महाशिवरात्रीनिमित्त सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील भक्तांनी पारगाव ते श्रीक्षेत्र वेळेश्वर देवस्थानपर्यंत दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते, या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले भक्तगण.२) वेळेश्वर मंदिराचे छायाचित्र.