शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: एक किलो बटाट्यांसोबत नेते जमले डझनभर; स्वपक्षीय खासदारावर भडकले परेश रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 13:56 IST

भाजपा खासदाराच्या चमकोगिरीवरुन परेश रावल यांचा टोला

अहमदाबाद: सध्या देशावर कोरोनाचं मोठं संकट आहे. या संकट काळात गरिबांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. अनेक जण शांतपणे गरजूंना मदत करत आहेत. तर दुसरीकडे काही जण यातही चमकोगिरी करत आहेत. या दिखाऊ सोशलवर्कचे फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. भाजपा खासदाराचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरुन परेश रावल यांनी मार्मिक टोला लगावत नाराजी व्यक्त केली आहे. परेश रावल यांनी गुरुवारी संध्याकाळी एक फोटो ट्विट केला आहे. 'आलू एक दर्जन, दयालु दो दर्जन', असं वाक्य फोटोसोबत या ट्विटमध्ये आहे. विशेष म्हणजे हा फोटो भाजपाचे खासदार सत्यजेव पचौरी यांचा आहे. ते लोकसभेत उत्तर प्रदेशातल्या कानपूरचं प्रतिनिधीत्व करतात. हा फोटो पाहून रावल यांच्यासोबत अनेकांनी पचौरींवर टीका केली आहे. फोटोमध्ये पचौरीसोबत मोठी गर्दी दिसते आहे. ही सगळी मंडळी एका भांड्यात बटाटे टाकत आहेत.  सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्कचा वापर करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा केलं आहे. मात्र हे आवाहन त्यांच्याच नेत्यांपर्यंत पोहोचलंय का, हा प्रश्न अनेकांना पचौरींचा फोटो पाहून पडला आहे. पचौरी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी जमलेल्या सगळ्यांनीच सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजवले असून काहींनी मास्कदेखील घातलेला नाही. कोणाच्याही हातात ग्लव्जदेखील नाही. याशिवाय भाजपा खासदार पचौरींनी फोटो काढताना चेहऱ्यावरील मास्क हटवला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParesh Rawalपरेश रावलBJPभाजपा