नवी दिल्ली - बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात कट्टरपंथीचे सरकार आलं तेव्हापासून भारत आणि बांगलादेशाचे संबंध बिघडले आहेत. युनूस सरकारमधील लोक भारताविरोधात गरळ ओकत आहेत. त्याठिकाणी अल्पसंख्याक आणि विशेषत: हिंदूवरील अत्याचार वाढले आहेत. त्यात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला बांगलादेशात बोलावून त्यांनी भारताला डिवचलं आहे. या सर्व घटना भारताची डोकेदुखी वाढवण्यासोबतच सहनशीलतेची परीक्षा घेण्यासारखं आहे.
भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान ही जोडी आधीच कुरापती करत आहेत. त्यात आता युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशही त्यात सहभागी झाल्यानं भारतावर तिहेरी संकट उभं राहिले आहे. अलीकडेच आसामच्या विद्रोही संघटना ULFA (यूनाइटेड लिबरेशन फ्रँट ऑफ आसाम) चा प्रमुख परेश बरूआचा ठिकाणा बदलला आहे. पाकिस्तान, चीन, आयएसआयच्या कटात अडकून बांगलादेश बरूआला एक मोहरा म्हणून वापरत आहे.
चीनने उल्फाचा प्रमुख बरूआ ठावठिकाणी बदलला
ULFA चा नेता परेश बरूआने त्याचा ठावठिकाणा बदलला आहे. सूत्रांनुसार पहिला तो अरुणाचल प्रदेशच्या म्यानमार बॉर्डरवरील रुईली येथे राहत होता. हा भाग चीनमध्ये येतो. अनेक वर्षापासून बरूआ त्याचठिकाणी वास्तव्य करतो. आता चीनने त्याचा ठिकाणा बदलला असून त्याला युन्नान प्रांताच्या शिशुआंगबन्नाच्या स्वायत्त क्षेत्रात पाठवले आहे. त्यामागे म्यानमारमध्ये चाललेलं विद्रोही आंदोलन कारणीभूत आहे.
ISI, बांगलादेश आणि चीनचा मोहरा कसा बनला बरूआ?
९० च्या दशकात आसाममध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता तेव्हा ULFA चा परेश बरूआ भारतासाठी टेन्शन बनला. भारतीय सैन्याच्या कठोर भूमिकेनंतर बरूआ सीमेपलीकडून त्याचे संघटन चालवू लागला. तो बांगलादेशात गेला. बांगलादेशात खालिदा जिया यांचं सरकार कमकुवत झाल्यानंतर त्याला सरकारकडून संरक्षण मिळणे बंद झाले. बांगलादेशातील २००८ च्या निवडणुकीपूर्वी तो तिथून निसटला आणि रुईली येथे राहू लागला. २००९ ते २०२४ पर्यंत शेख हसीना यांचं बांगलादेशात सरकार होते, हसीना यांचे भारताची सलोख्याचे संबंध होते, ते कायम आयएसआय, चीन आणि पाकिस्तान समर्थिक बांगलादेशातील लोकांना कायम खटकत होते.
कट्टरपंथींचं सरकार येताच बांगलादेशात ISI पुन्हा सक्रीय
बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर युनूस यांच्या नेतृत्वातील सरकारने आयएसआयला रेड कार्पेट टाकले. भ्रष्टाचारात अडकलेल्या खालिदा जिया यांना तुरूंगातून बाहेर काढले. युनूस सरकारने उघडपणे आयएसआयला बांगलादेशात आमंत्रित केले. त्यामुळे आयएसआयसाठी बांगलादेश पुन्हा खुलं मैदान झाले आहे. २०१४ च्या एका प्रकरणात परेश बरूआला बांगलादेशात मृत्यूची शिक्षा सुनावली. डिसेंबर २०२४ मध्ये त्याच्या शिक्षेला जन्मठेपेत बदलण्यात आले.
पूर्वोत्तर भारतात शेकडो बंडखोर म्यानमारच्या सागिंग क्षेत्रातील सिंगकालिंग परिसरात पहाडी भागात लपलेले आहेत. देशात जातीय दंगली भडकल्या तर सैन्याचं या बंडखोरांवर फारसं लक्ष जाणार नाही असं तज्त्र सांगता. हे बंडखोर ULFA संघटनेचे असून ते आसामच्या स्वातंत्र्याची मागणी करतात. आता त्याच्या म्होरक्या बरूआचं ठावठिकाणा बदलणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. रुईली चीन म्यानमार सीमेवरील व्यापाराचे मोठे केंद्र आहे. इथून भारतीय सीमाही जवळ आहे. बरूआ याठिकाणाहून त्याचे नेटवर्क सहजपणे चालवू शकतो. मात्र म्यानमारमधील अस्थिरता त्यामुळे बरूआला शिशुआंगबन्ना सुरक्षित पर्याय आहे. भारताने आधीच बरूआला सोपवण्याची मागणी चीनकडे केली आहे. बांगलादेशात आयएसआय सक्रीय होणे, चीननं बरूआला संरक्षण देणे यातून बरूआचा वापर करून पूर्वोत्तर राज्यात दहशतवादी नेटवर्क उभारलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भारताला सतर्क राहण्याची गरज आहे.