पालकांच्या कौतुकाने भारावली मुले

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30

पुणे : घरची स्थिती हालाखीची असतानाही ; दहावीच्या परिक्षेत चांगले यश संपादन करणा-या वस्त्यांमधील मुलांचा सत्कार आपल्याच पालकांच्या हस्ते करण्याचा अनोखा उपक्रम आयडेंटी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने शनिवारी घेण्यात आला. या कार्यक्रमात सिंहगड रस्ता परिसरातील चुनखडी, कोरेगाव पार्क वसाहत, कल्यानीनगर, देवकर वस्ती या वस्तीमधील या कौतुक सोहळयाने या मुलांचे पालकही भारावून गेले होते. अतिशय प्रतिकूल स्थितीत या संस्थेच्या मदतीने या वस्तीवरील सौरभ सुर्यवंशी, करण सुर्यवंशी, विशाल भगत, निळकंठ खांडेकर, कोरेगाव पार्क येथील इश्वर वनकेरी, देवकर वस्ती येथील दत्ता जाधव, या मुलांचा शालेय साहित्य तसेच पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. वस्त्यांमध्ये राहून या मुलांनी दहावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविले आहे. मात्र, मुख्य प्रवाहाच्या बाहेर असल्याने त्यांच्य

Parents appreciated by parents | पालकांच्या कौतुकाने भारावली मुले

पालकांच्या कौतुकाने भारावली मुले

णे : घरची स्थिती हालाखीची असतानाही ; दहावीच्या परिक्षेत चांगले यश संपादन करणा-या वस्त्यांमधील मुलांचा सत्कार आपल्याच पालकांच्या हस्ते करण्याचा अनोखा उपक्रम आयडेंटी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने शनिवारी घेण्यात आला. या कार्यक्रमात सिंहगड रस्ता परिसरातील चुनखडी, कोरेगाव पार्क वसाहत, कल्यानीनगर, देवकर वस्ती या वस्तीमधील या कौतुक सोहळयाने या मुलांचे पालकही भारावून गेले होते. अतिशय प्रतिकूल स्थितीत या संस्थेच्या मदतीने या वस्तीवरील सौरभ सुर्यवंशी, करण सुर्यवंशी, विशाल भगत, निळकंठ खांडेकर, कोरेगाव पार्क येथील इश्वर वनकेरी, देवकर वस्ती येथील दत्ता जाधव, या मुलांचा शालेय साहित्य तसेच पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. वस्त्यांमध्ये राहून या मुलांनी दहावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविले आहे. मात्र, मुख्य प्रवाहाच्या बाहेर असल्याने त्यांच्या या यशाकडे दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे संस्थेच्या वतीने वस्तीमध्ये या मुलांच्या पालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या मुलांनी इतर मुलांना मार्गदर्शन करीत पुढील त्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. संस्थेच्या प्रकल्प अधिकारी संगीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका निशा शिंदे, योगीता पगारे, मनिषा गुलबिरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
=========
फोटो आहे
राऊत लॉगईन मध्ये
4 सत्कार या नावाने
फोटो ओळ : वस्ती मधील 10 वीत यश मिळविणा-या मुलांचा त्यांच्याच पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ( शक्य असल्यास फोटो नक्की घ्या)
========================
स्ट्रीप बातमी
डॉक्टर लेखा परिक्षकांचा स्नेह मेळावा
औंध : जागतिक डॉक्टर दिन तसेच लेखा परिक्षक दिना निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बाणेर परिसरातील डॉक्टर तसेच लेखा परिक्षकांचा स्नेह मेळावा मंगळवारी ( दि.1) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विशेष सांस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉक्टर आणि लेखा परिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ज्येष़्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.रमेश वझरकर,महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र जोशी, डॉ.राजेश देशपांडे, कोथरूड मतदारसंघाचे उपाध्यक्ष नितीन कळमकर यावेळी उपस्थित होते. ====== फोटो आहे राऊत लॉगईन मध्ये 2 सत्कार या नावाने

Web Title: Parents appreciated by parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.