पारशिवनी... करिअर मार्गदर्शन

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:21+5:302015-01-23T01:05:21+5:30

फोटो...

Parasivi ... Career Guidance | पारशिवनी... करिअर मार्गदर्शन

पारशिवनी... करिअर मार्गदर्शन

टो...
करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारशिवनी : स्थानिक यंग अल्टीमेट व्हायलंट असोसिएशन आणि एनआयटी ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, रोजगाराच्या उपलब्ध संधी या विषयावर सखोल माहितीसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन स्थानिक अमन सभागृहात करण्यात आले. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून नागपूर इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र गोळे, प्रा. निखिल आठले आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य नागेश राव, विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघाचे अध्यक्ष दीपक पालीवाल, महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षा अनिता भड यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्राचार्य गजानन पोटभरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय माजी जि.प. समाजकल्याण सभापती हर्षवर्धन निकोसे यांनी केले. या मार्गदर्शन मेळाव्याला तालुक्यातील एकूण १९ शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास डुमन चकोले, धनराज पालीवाल, सलीम बाघाडे, रंजना कोल्हे, शेखर महाजन, प्रा. वंदना पोटभरे, प्रा. चित्रा कहाते, वैभव खोब्रागडे, रशिकांत बागडे, चेतन देशमुख, लाला खतोरे, राहुल सावरकर, बंडू कोटगुले, विक्की कोटगुले, संजय पनवेलकर, शेषराव घरत, प्रमोद काकडे आदींनी सहकार्य केले. (तालुका वार्ताहर)

Web Title: Parasivi ... Career Guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.