शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

परमबीरसिंह देशातच; 48 तासांत होणार हजर, सुप्रीम कोर्टात माहिती; अटकेपासून मिळाले संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:13 IST

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला अटकेपासून संरक्षण द्यावे. मला कुठेही पलायन करण्याची इच्छा नाही, असे परमबीरसिंह यांनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल व न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास येत्या ४८ तासांत सीबीआय अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर होण्याची तयारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी दर्शविली आहे. महाराष्ट्रातील खंडणी प्रकरणासह अन्य फौजदारी गुन्ह्यांमध्ये अटक होण्यापासून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. तसेच तपासात सहभागी व्हावे, असा आदेश न्यायालयाने परमबीर यांना दिला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे.मी काहीतरी चुकीचे केले आहे असे चित्र निर्माण होऊ नये. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला अटकेपासून संरक्षण द्यावे. मला कुठेही पलायन करण्याची इच्छा नाही, असे परमबीरसिंह यांनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल व न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले. 

कारवाई केलेल्यांकडूनच तक्रारी दाखलपरमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, मी ज्या बुकी व खंडणीखोरांविरोधात कारवाई केली, तो प्रत्येक माणूस माझ्याविरोधात तक्रार दाखल करू लागला आहे. अशा वेळी मी व माझ्या सहकाऱ्यांनी काय करावे अशी अपेक्षा आहे? सुरक्षितता हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र मागे घ्यावे, असे राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालकांनी मला सांगितले होते, असा आरोपही परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

खंडणीखोर, भ्रष्ट पोलीस आणि बुकी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्यामुळे पोलीस आयुक्तांना जीवाच्या भीतीने लपून बसावे लागत असेल तर सामान्य नागरिकांबाबत काय होत असेल, याची आम्हाला चिंता वाटते. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आणि तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्यातील हा खटला दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत चालला आहे. - सर्वोच्च न्यायालय. 

फरार होण्याची इच्छा नाही -- परमबीरसिंह नेमके कुठे आहेत हे कळत नाही तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळण्यासंदर्भातील त्यांच्या अर्जाची आम्ही दखल घेणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातील सुनावणीत सांगितले होते. - याआधी अनेकदा नोटिसा तसेच वॉरंट बजावूनही परमबीर न्यायालयासमोर हजर झाले नव्हते. सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांच्या वकिलाने सांगितले की, परमबीरसिंह देशामध्येच आहेत. - त्यांना फरार होण्याची किंवा कुठेही पळून जायची अजिबात इच्छा नाही, पण ते महाराष्ट्रात गेल्यास तिथे त्यांच्या जीवाला धोका आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय