शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Param Bir Singh: गृहमंत्र्यांवरील आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करा; परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:52 IST

बदली रद्द करण्याची मागणी, माझ्याविरोधात काही पावले उचलली गेल्यास त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी कोर्टाने निर्देश द्यावेत

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दोन दिवसांपूर्वी गंभीर आरोप करणारे राज्याचे पोलीस महासंचालक (होमगार्ड) परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून आपल्याला आकसाने हटविण्यात आले, ती बदली रद्द करावी, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

अनिल देशमुख गृहमंत्रिपदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत आहेत व महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आपल्याला हवा तसा तपास करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत आहेत, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. यावर सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या कथित भ्रष्ट व्यवहारांची माहिती मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना कळविली. त्यानंतर लगेचच १७ मार्च रोजी आपली मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. त्यामुळे ही बदली  कुहेतूने केल्याचे स्पष्ट दिसते. 

आपली  बदली आयपीएस सेवानियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या विरुद्ध  असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काही महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास करून आपण धक्कादायक अशी माहिती उघड करण्याच्या बेतात असतानाच अनिल देशमुख यांना वाचविण्याच्या राजकीय हेतूने बळीचा बकरा बनवून आपली बदली करण्यात आली, असा दावा परमबीर सिंग यांनी याचिकेत केला आहे.

मला संरक्षण द्या.. माझ्याविरोधात काही पावले उचलली गेल्यास त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी कोर्टाने निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. 

सीसीटीव्ही फूटेज घ्या.. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने द्यावेत, अशी मागणीही परमबीर सिंग यांनी केली आहे. 

महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा तपास करण्याची सीबीआयला आधी सरसकट अनुमती असायची; पण राज्य सरकारने ती रद्द केल्याने आपल्याला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. - परमबीर सिंग, पोलीस महासंचालक (होमगार्ड) 

आरोपांचा पुनरुच्चारगृहमंत्री देशमुख यांनी गेल्या फेब्रुवारीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून, त्या वेळी गुन्हा अन्वेषण शाखेत असलेले सहायक निरीक्षक सचिन वाझे आणि मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त (सामाजिक सेवा शाखा) संजय पाटील यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांची आपल्या शासकीय निवासस्थानी बैठक घेऊन, हॉटेल, बार आणि अन्य आस्थापनांकडून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करून ती रक्कम आपल्याकडे आणून देण्याचे टार्गेट ठरवून दिले, या आरोपाचा परमबीर सिंग यांनी याचिकेत पुनरुच्चार केला आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगCourtन्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझे