शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पॅराडाइज पेपर्स : निधीच्या हेराफेरीप्रकरणी सेबीची कंपन्यांवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 18:49 IST

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला एक दोन दिवस उरले असतानाच काळ्या पैशाबाबत पॅराडाइज पेपर्समधून झालेल्या गौप्यस्फोटांमुळे भारताबरोबरच जगभरात खळबळ माजली आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला एक दोन दिवस उरले असतानाच काळ्या पैशाबाबत पॅराडाइज पेपर्समधून झालेल्या गौप्यस्फोटांमुळे भारताबरोबरच जगभरात खळबळ माजली आहे. या धक्कादायक गौप्यस्फोटांनंतर बाजार नियामक संस्था असलेल्या सेबीनेही पॅराडाइज पेपर्स प्रकरणी कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. सेबी विविध सुचीबद्ध कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांद्वारे निधीची झालेली कथित हेराफेरी आणि कंपनी संचालनामधील उणिवांचा तापास करणार आहे. त्यामध्ये विजय माल्याशी संबंधित प्रवर्तकांचाही समावेश आहे.  पॅराडाइज पेपर्समध्ये बँकांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय माल्याचेही नाव आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, माल्याशी संबंधित काही कंपन्यांची चौकशी आधीपासूनच सेबी आणि अन्य कंपन्या करत आहेत. आता जर इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेशन जर्नलिस्टने  सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांमध्ये काही नवा खुलासा झाला असेल तर त्यावर अधिक लक्ष दिले जाईल. या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, उघड झालेल्या कागदपत्रांमध्ये सुचिबद्ध कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित प्रवर्तकांबाबत खुलासा करण्यात आल्यास कंपनी व्यवस्थापन, नियम आणि निधीमध्ये हेराफेरीसोबत काही अन्य अनियमितता तर नही ना याची पाहणी केली जाईल.  याबाबत शेअर बाजार आणि सेबी संबंधित सुचिबद्ध कंपन्यांकडून त्यांची परदेशात शाखा असल्यास त्याबाबतची माहिती मागवली जाईल. त्यानंतर संबंधित कंपनीकडून दिलेल्या सांवैधानिक आणि नियामक माहितीची तपासणी केली जाईल.   केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच काळा पैशांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. जर्मनीतील  'सुददॉइश झायटुंग' या वृत्तपत्रानं काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केलेला आहे. या वृत्तपत्रानं 'पॅराडाइज पेपर्स' उजेडात आणले आहेत. याच वृत्तपत्रानं 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासा केला होता. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते.  'पॅराडाइज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे.  पॅराडाइज पेपर्स लीकमध्ये पनामाप्रमाणे कित्येक भारतीय राजकीय नेते, अभिनेते आणि व्यावसायिकांच्याही नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

तर, यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भारत 19व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. बर्म्युडामधील 'अॅपलबाय' या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सर्वाधिक कागदपत्रं उघड करण्यात आली आहेत.  जागतिक पातळीवर अमेरिकेतील  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील उद्योग मंत्रालयाचे सचिव विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारblack moneyब्लॅक मनीIndiaभारत