प. बंगालच्या 13 ‘राक्षसी’ पंचांना 20 वर्षे कारावास
By Admin | Updated: September 21, 2014 03:05 IST2014-09-21T03:05:02+5:302014-09-21T03:05:02+5:30
एका आदिवासी मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी दोषी आढळलेल्या 13 जणांना येथील एका न्यायालयाने आज शनिवारी 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली़

प. बंगालच्या 13 ‘राक्षसी’ पंचांना 20 वर्षे कारावास
कोलकाता : पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील लभपूर गावात एका आदिवासी मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी दोषी आढळलेल्या 13 जणांना येथील एका न्यायालयाने आज शनिवारी 2क् वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली़
गत जानेवारी महिन्यात या 2क् वर्षे पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता़ जातीबाहेरच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या सबबीखाली गावपंचायतीने या पीडितेला 25 हजार रुपये दंड ठोठावला होता़
मुलीच्या कुटुंबाने एवढी मोठी दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली होती़ यानंतर गावपंचायतीतील प्रमुखाने या मुलीवर बलात्कार करण्याचे आदेश दिले होत़े गावपंचायतीच्या आदेशानुसार, या मुलीला बळजबरीने एका झोपडीत नेऊन 1क् जणांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला होता़
विशेष म्हणजे बलात्कार करणा:यांपैकी अनेक जण एकाच कुटुंबातील होत़े यानंतरही अनेकदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला़ या प्रकरणी पीडितेने 13 जणांविरुद्ध तक्रार
नोंदविली होती़
31 लोकांच्या साक्षी तपासल्या. न्यायालयाने या सर्वाना दोषी ठरवले होत़े हे प्रकरण धक्कादायक असल्याचे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले
होत़े (वृत्तसंस्था)