शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाने मारहाण करत केली दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:25 IST

गायी चोरल्याच्या संशयावरुन जमावाने दोन जणांची मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली.

कोलकाता : गायी चोरल्याच्या संशयावरुन जमावाने दोन जणांची मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली.मृत एक व्यक्ती आसामचा तर, दुसरा पश्चिम बंगालमधील आहे. हफीजुल शेख (१९) आणि अन्वर हुसेन (१९) अशी मृतांची नावे आहेत.पोलिसांनी या दोन्ही हत्यांना दुजोरा देताना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे रात्री एका पिकअप व्हॅनमधून गावातून चालले होते. या व्हॅनमध्ये सात गायी होत्या. बहुधा रस्त्यात भरकटल्यामुळे ते या गावातून जात होते. याचवेळी गावातील काही जणांनी ही व्हॅन रोखली. त्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला. पण, व्हॅनमधील दोन जणांना या जमावाने पकडले. हे गाय चोर आहेत असा संशय घेऊन गावकºयांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर या जमावाने त्यांना प्रचंड मारहाण केली. या व्हॅनची तोडफोड करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी व्हॅनमधील या गायी ताब्यात घेतल्या आहेत. ही घटना धूपगडी शहरापासून १५ किमी अंतरावर बडहरिया गावात घडली. मृतातील हफीजुल शेख हा आसामच्या धुबडी जिल्ह्यातील रहिवासी होता. तर, अन्वर हुसेन पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील पातालहावा येथील रहिवासी होता. हे दोघे व्यापारी होते अथवा नाही याची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस