पेपर तपासणीची चौकशी होणार

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

पुणे : विमाननगर येथील एका शाळेतील शिक्षकाकडील दहावीच्या उत्तरपत्रिका नववीचे विद्यार्थी तपासत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

The paper inquiry will be conducted | पेपर तपासणीची चौकशी होणार

पेपर तपासणीची चौकशी होणार

णे : विमाननगर येथील एका शाळेतील शिक्षकाकडील दहावीच्या उत्तरपत्रिका नववीचे विद्यार्थी तपासत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
सध्या दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. विमाननगर येथील एका शाळेतील शिक्षकाकडेही या उत्तरपत्रिका तपासणीचे काम आहे. हा शिक्षक त्याच्याच शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका तपासून घेत आहे, अशी तक्रार विभागीय शिक्षक मंडळाकडे आली आहे. याबाबत बोलताना विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुनिल चौहान म्हणाले, दहावीच्या उत्तरपत्रिका नववीचे विद्यार्थी तपासण्याचा प्रकार घडू शकत नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीमध्ये माहिती समोर येईल.
------------

Web Title: The paper inquiry will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.