पंतनगर पोलीस ठाण्याबाहेर धरणे
By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:20+5:302015-06-29T00:38:20+5:30

पंतनगर पोलीस ठाण्याबाहेर धरणे
>पंतनगर पोलीस ठाण्याबाहेर धरणेमुंबई : घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो स्थानिक नागरिकांनी एकत्र येत रविवारी रात्री धरणे आंदोलन केले. परिसरात चार दिवसांपूर्वी एका विशेष मुलीवर काही नराधरांमी सामुहिक अत्याचार केला होता. मात्र चार दिवसांनंतरही गुन्हा दाखल करून घेणार्या पोलिसांना आरोपींना अटक करण्यात अपयश आले होते. परिणामी पोलिसांविरोधात संतापलेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही काळाने पोलीस ठाण्याबाहेरील तणाव निवळला.............................