पानससहा

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:38+5:302015-08-19T22:27:38+5:30

तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा

Pansasaha | पानससहा

पानससहा

न वर्षांतील नीचांकी पाणीसाठा
पुणे : राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया दाट झाली आहे. मॉन्सूनमध्ये आगामी काळात पावसात पडणार्‍या मोठ्या खंडामुळे व कडक उन्हाच्या झळांमुळे खरिपाच्या पेरण्या जिरायती भागात धोक्यात येण्याची शक्यता असून अशा स्थितीत राज्यातील छोट्या मोठ?ा २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
ऑगस्टमध्ये मंदावत गेलेल्या पावसामुळे ही टक्केवारी कमीच राहिली असून दोन वर्षांपूर्वी याच सुमारास धरणांत ७५ टक्के तर गेल्या वर्षी याच तारखेला ६१ टक्के पाणी साठा होता. आजमितीस राज्य शासनाच्या २ हजार ५१0 व खासगी १६ अशा एकूण २५२६ प्रकल्पांमध्ये प्रकल्पीय साठा ३७ हजार ५0७ द.ल.घ.मी. व उपयुक्त पाणीसाठा १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. आहे. त्याची टक्केवारी ४७ आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोकणातील १५८ प्रकल्पांमधील साठ्याची तुलनेने स्थिती बरी असून ८0 टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ८ टक्के, नागपूरमधील ३६६ प्रकल्पांत ६७ तर अमरावतीमधील ४५३ धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमधील ३५0 धरणांत ४0 टक्के आणि पुणे विभागातील ३६९ प्रकल्पांत ५१ टक्के पाणीसाठा आहे.
मोठ्या धरणांची संख्या कोकण, मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक व पुणे विभागात ८४ असून त्यात ९ हजार १५६ द.ल.घ.मी , मध्यम प्रकल्पांची संख्या २२२ असून त्यामध्ये २ हजार ६५ द.ल.घ.मी तर लघु प्रकल्पांची संख्या २ हजार २0४ प्रकल्पांत १६३२ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)

राज्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघू अशा २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत ३७ हजार ५0७ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणीसाठा असून त्यापैकी केवळ १७ हजार ७६५ दलघमी साठा पिण्यासाठी, शेतीसाठी वापर करण्याजोगा आहे. पावसाळ्याच्या आजपयंर्तच्या अडीच महिन्यांच्या एकत्रित पाणीसाठ्याची बेरीज ३७ हजार ५0७ दलघमी असून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा खूपच कमी असल्याने चिंता निर्माण झाली आहे.


२ हजार ८६९ धरण प्रकल्पांत गेल्या वर्षी १८ ऑगस्टच्या सुमारास २२ हजार ८६९ दलघमी म्हणजे ६१ टक्के तर २0१३ मध्ये, दोन वर्षांपूर्वी याच तारखेला ७५ टक्के म्हणजे २८ हजार १७१ दलघमी पाणीसाठा होता.

Web Title: Pansasaha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.