राज्यसभेत पानसरे यांच्या हत्येचे पडसाद
By Admin | Updated: February 24, 2015 23:34 IST2015-02-24T23:34:24+5:302015-02-24T23:34:24+5:30
पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, श्रमिक कष्टकरी व कामगारांचे पुढारी, तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पडसाद मंगळवारी राज्यसभेतही उमटले़

राज्यसभेत पानसरे यांच्या हत्येचे पडसाद
नवी दिल्ली : पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, श्रमिक कष्टकरी व कामगारांचे पुढारी, तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पडसाद मंगळवारी राज्यसभेतही उमटले़ काँग्रेसचे शांताराम नाईक यांनी पानसरेंच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला़ भाकपा नेते डी़ राजा यांनीही पानसरेंच्या हत्येचा निषेध केला़ सरकारने त्यांच्या हत्येची सखोल चौकशी करून मारेकऱ्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे व त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असे ते म्हणाले़.