शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Bengaluru Stampede : “मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:05 IST

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत जीव गमावलेला महाविद्यालयीन विद्यार्थी मनोज कुमारच्या वडिलांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.

आयपीएल विजेत्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान उद्भवलेल्या चेंगराचेंगरीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच दरम्यान मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चेंगराचेंगरीत जीव गमावलेला महाविद्यालयीन विद्यार्थी मनोज कुमारच्या वडिलांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. मनोज कुमारचे वडील पाणीपुरीचा व्यवसाय करतात.

"मी मनोजला दुकानात पाणीपुरीची एकही प्लेट कधी धुवू दिली नाही कारण मला वाटायचं त्याने कॉलेजमध्ये जावं आणि खूप शिकावं. मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं ​​होतं, आता तो सोडून गेला" असं मनोजच्या वडिलांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं आहे. १८ वर्षीय मनोज कुमार बंगळुरूमधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फर्स्ट इअरला होता. मनोज शेजारी राहणाऱ्या त्याच्या तीन मित्रांसह आरसीबीच्या विजयाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेला होता.

 "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?

मुलाच्या मृत्यूसाठी मित्रांना धरलं जबाबदार

मनोजचा मित्र सात्विकही तिथे उपस्थित होता. त्याने सांगितलं की, मनोजनेच स्टेडियममध्ये जाण्यास सांगितलं होतं. मात्र मनोज कुमारच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी त्याच्या मित्रांना जबाबदार धरलं आहे. तुम्ही लोकांनी त्याला स्टेडियममध्ये जाण्यास भाग पाडलं असं ते म्हणाले. मित्रांनी सांगितलं की, मोहम्मद हुसेन या व्यक्तीने मनोजला रुग्णालयात नेण्यास मदत केली. हुसेनकडे मनोजचा मोबाईल होता. 

"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो

चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला. पोस्टमॉर्टम न करता मुलाचा मृतदेह द्या अशी कळकळीची विनंती ते आता करत आहेत. मी मुलगा गमावला आहे. आता त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका असं ते सतत म्हणत आहेत. त्यांचं हे दु:ख पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.  

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीPoliceपोलिसRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरStampedeचेंगराचेंगरी