पनगढिया आज स्वीकारणार पदभार

By Admin | Updated: January 12, 2015 00:41 IST2015-01-12T00:41:27+5:302015-01-12T00:41:27+5:30

नियोजन आयोग मोडीत काढून त्याऐवजी नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या निति आयोगाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया

Pangadia today accepts responsibility | पनगढिया आज स्वीकारणार पदभार

पनगढिया आज स्वीकारणार पदभार

नवी दिल्ली : नियोजन आयोग मोडीत काढून त्याऐवजी नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या निति आयोगाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया हे सोमवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
निति आयोगाचे दोन पूर्णकालिक सदस्य आपल्या आयोगात केव्हा रुजू होणार, याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही.
केंद्र सरकारने निति आयोगाचा उपाध्यक्ष, दोन पूर्णकालिक सदस्य, चार पीठासीन अधिकारी (केंद्रीय मंत्री) व ३ विशेष निमंत्रितांच्या नियुक्तीची घोषणा गेल्या ५ जानेवारीला केली होती. कार्यालयातील पनगढियांच्या कक्षाचे नूतनीकरणही करण्यात आले आहे. कक्षाबाहेर नवी नेमप्लेट लावण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)


 

Web Title: Pangadia today accepts responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.