पनीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी, पलनीस्वामी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
By Admin | Updated: February 14, 2017 13:29 IST2017-02-14T12:55:36+5:302017-02-14T13:29:10+5:30
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांना न्यायालयाने चारवर्षांची शिक्षा सुनावताच मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पनीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी, पलनीस्वामी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 14 - तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांना न्यायालयाने चारवर्षांची शिक्षा सुनावताच मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. शशिकला यांच्या मर्जीतील ई. पलनीस्वामी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
पनीरसेल्वम यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे अण्णाद्रमुकच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवर म्हटले आहे. विधिमंडळ नेतेपदी निवडण्यात आलेले पलनीसमी सध्याच्या सरकारमध्ये बांधकाममंत्री आहेत. शशिकलांशी निष्ठावंत असणा-या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.
आणखी वाचा
दरम्यान पनीरसेल्वम यांनी सर्व आमदारांना मतभेद बाजूला ठेऊ, पक्ष एकसंध ठेवण्यासाठी एकत्र काम करु आणि अम्माची सत्ता कायम राखू असे आमदारांना आवाहन केले आहे. अम्माची धोरणे, योजना यापुढे कायम सुरु राहतील. कायदा-सुव्यवस्था राखणे आमची जबाबदारी आहे. मला पाठिंबा देणा-या सर्व नेते, कार्यकर्ते, तरुणांचे मी आभारी आहे असे पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. 5 फेब्रुवारीला शशिकलाची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पनीरसेल्वम यांनी बंडाचे निशाण फडकावले.