पंडित नेहरूंचे दस्तावेज सार्वजनिक करणार
By Admin | Updated: November 16, 2014 01:56 IST2014-11-16T01:56:02+5:302014-11-16T01:56:02+5:30
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित दस्तऐवज सार्वजनिक करण्याचे प्रयत्न भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आरंभले आहेत़

पंडित नेहरूंचे दस्तावेज सार्वजनिक करणार
नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित दस्तऐवज सार्वजनिक करण्याचे प्रयत्न भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आरंभले आहेत़ हे दस्तऐवज सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे असल्याने रालोआ सरकारने अप्रत्यक्षपणो याबाबतचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलवला आह़े
काल शुक्रवारी पंडित नेहरूंच्या 125 जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी नेहरूंसंदर्भातील सर्व दस्तऐवज संकलित करण्याचे संकेत दिले होत़े
नेहरू राष्ट्रपुरुष आहेत़ त्यांच्यासंदर्भातील सर्व दस्तऐवज संकलित केले गेले तरच सर्वाना
नेहरू कळू शकतील़ पब्लिक रेकॉर्ड रूल्स 1997 अंतर्गत त्यांच्याबाबतचे सर्व दस्तऐवज आणि साहित्य संकलित केल्या जाईल, असे सिंग म्हणाल़े
सूत्रंच्या मते, नेहरूंबाबतचे
सर्व दस्तऐवज सध्या नेहरू-गांधी कुटुंबाच्या ताब्यात आहेत़
हे सर्व दस्तऐवज संकलित
करून सार्वजनिक करण्यासाठी लवकर पावले उचलली जाण्याची शक्यता आह़े (लोकमत न्यूज नेटवर्क)