पंडित नेहरू यांना देशाची आदरांजली

By Admin | Updated: May 28, 2014 03:48 IST2014-05-28T03:14:07+5:302014-05-28T03:48:11+5:30

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मंगळवारी त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली

Pandit Nehru honors the country | पंडित नेहरू यांना देशाची आदरांजली

पंडित नेहरू यांना देशाची आदरांजली

नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मंगळवारी त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्टÑपती प्रणव मुखर्जी, उपराष्टÑपती हमिद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शांतिवन येथे नेहरूंच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली. शाळकरी विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या ‘नेहरू चाचां’चे स्मरण केले. मोदींची नेहरूंना श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही वेळाने टष्ट्वीट करून पंडित नेहरूंना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Pandit Nehru honors the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.