पणजी पोटनिवडणुकीत चार उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: January 29, 2015 03:29 IST2015-01-29T03:29:46+5:302015-01-29T03:29:46+5:30
पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होऊन रवींद्र बाबुली दिवकर (अपक्ष) यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला

पणजी पोटनिवडणुकीत चार उमेदवार रिंगणात
पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होऊन रवींद्र बाबुली दिवकर (अपक्ष) यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. आता चारच उमेदवार रिंगणात उरले आहेत.
शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. काँग्रेसतर्फे सुरेंद्र फुर्तादो, भाजपाचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, कूळ-मुंडकारांच्या वतीने सदानंद वायंगणकर व अपक्ष समीर केळेकर अशी चारच नावे आता उरली आहेत. अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी बुधवारी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन काँग्रेस उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)